The survey is being conducted for the second time in Pandharpur Mangalwedha constituency  
सोलापूर

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भावी 'आमदार' जनतेच्या मनातील असणार?

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर ) : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असून पक्षीय उमेदवारांची निश्चिती अजून झाली नसली तरी उमेदवार कोण असावा?  याबाबत मतदारसंघात दुसऱ्यांदा सर्व्हेक्षण सुरू आहे. हे सर्व्हेक्षण नेमके कुणाचे यांची चर्चा सुरू आहे.

स्व. भालके यांच्या रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सध्या अनेकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. राष्ट्रवादीतून देखील नेमकी संधी कोणाला मिळणार याबाबत देखील तर्कवितर्क लढवले जात असताना राष्ट्रवादीचे नेते याबाबत संभ्रम ठेवत उमेदवार हा भालके कुटूंबातील असून तो कोण हे मात्र सांगत नाहीत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी स्व. भालकेच्या पश्चात त्यांचे पुत्र भगीरथ भालकेना संधी द्यावी, अशी मागणी व्यक्त होत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार हा जनतेच्या मनातील असणार असल्याचे सांगितले. पण नेमकी संधी कुणाला देणार याची उत्सुकता लागली आहे. तर या मतदार संघाची जागा 2009, 2014 ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढविली तर 2019 रयतक्रांती पक्षाने लढविली असली तर प्रतिस्पर्धी गटानेही आपला उमेदवार जाहीर केला नाही. 

सध्या कोणत्या पक्षीय उमेदवाराला पसंती मिळते, त्याबाबत औरंगाबाद येथील एका संस्थेच्या माध्यमातून मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणामध्ये झालेली महाविकास आघाडी योग्य आहे का? महाविकास सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे का ? राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेली युती योग्य आहे का ? पंढरपूर मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोणत्या पक्षाचा विजयी व्हावा. राष्ट्रवादी व भाजपातून कुणाला संधी द्यावी, संभाव्य इच्छुक उमेदवाराला संधी दिली नाही तर दुसरी संधी कोणाला द्यावी.

स्व.आ. भालकेनी मतदारसंघात केलेले काम, सध्या मतदार संघात कोणत्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. अशा आठ प्रश्नाची प्रश्नावली तयार केली असून जनतेला विचारून त्यांची उत्तरे जनतेकडून घेतली जात आहे. त्यामध्ये मतदाराचे नाव व मोबाईल क्र न घेता मतदाराची जात, प.स.गण, व जि.प.गट यांची माहिती घेतली जात आहे. भविष्यात मतदारसंघांमध्ये जलसिंचनाच्या योजनेबरोबर तरुणांना रोजगार निर्मिती व पंढरपूर मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास, बसवेश्वर स्मारक करण्याची ची मागणी जनतेतून पुढे येत आहे, तर शरद पवारांनी पुढाकार घेऊन तयार केलेली महाविकासआघाडीचे कामाबाबत जनतेमधून समाधान होत असले तरी वीज तोडणीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या दुसऱ्यांदा सुरू असलेल्या सर्व्हेक्षणाच्या पडद्यामागे कोणत्या पक्ष आहे? याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT