shalabahya survey.jpg 
सोलापूर

शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेक्षणास शहरात प्रारंभ : पहिल्या दिवशी आढळली 29 मुले 

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका शिक्षण मंडळातर्फे शहरात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांच्या सर्व्हेक्षणास सुरुवात झाली आहे. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणाच्या पहिल्या दिवशी 29 मुले आढळल्याची माहिती मंडळाचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी शुक्रवारी दिली. 
याआधी 6 फेब्रुवारी रोजी मंडळातर्फे शहरात अशी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळाबाह्य 34 तर स्थलांतरित 6 अशी एकूण 40 मुले आढळून आली होती. आता शासनाच्या निर्देशानुसार नव्याने शुक्रवारपासून सर्व्हेक्षणास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी शहरात सर्वत्र सर्व्हेक्षण करण्यात आले. प्रशासनाधिकारी शेख यांनी स्वतंत्र पथकाद्वारे रेल्वे स्टेशन परिसरात सर्व्हेक्षण केले. यामध्ये त्यांना 17 मुले आढळली. शहराच्या अन्य भागात 12 असे एकूण 29 मुलांचा शोध लागला. या सर्व्हेक्षणात महापालिका तसेच खासगी शाळांच्या 22 केंद्रांच्या 2500 शिक्षकांचा सहभाग होता. हे शिक्षक सर्व्हेक्षक/प्रगणक म्हणून काम पाहणार आहेत. शहरातील प्रत्येक भागात अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना नजीकच्या शाळेत वयानुरुप इयत्तेमध्ये दाखल करण्याची सूचना संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात येणार आहे. 21 मार्चपर्यंत म्हणजे सलग 10 दिवस सर्व्हेक्षण होणार आहे, असे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT