Sushilkumar Shinde sakal
सोलापूर

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

मी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता सत्तेची चटक लागली आहे. त्यासाठी ते स्वतःला हवे तसे निर्णय घेत आहेत अशी टीका देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता सत्तेची चटक लागली आहे. त्यासाठी ते स्वतःला हवे तसे निर्णय घेत आहेत अशी टीका देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

समृद्धी लॉन्स येथील कोळी समाजाच्या पाठिंबा बैठकीदरम्यान त्यांनी मोदींवर तीव्र शब्दात टीका केली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीसारखे निर्णय देशावर लादून हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवण्याची टीका केली.

प्रणिती शिंदे या निवडणुकीत संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर शरद कोळी यांना जोरजोरात बोलण्याची गरज राहणार नाही; कारण संसदेत त्या कोळी समाजाचा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

२०२४ ची लोकसभा निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार असे सांगतानाच देशात एकदा का हुकूमशाही आली की मला बोलता येणार नाही. जर बोललोच तर जेलमध्ये जावे लागेल असे देखील यावेळी शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरी प्रकरण दाबण्याचा कोणताही प्रयत्न करू नये - टीएमसी नेते कुणाल घोष

SCROLL FOR NEXT