Arrest 
सोलापूर

अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या पंढरपूर तालुक्‍यातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून आज येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सुखदेव बोंगे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. 

मंगळवारी (ता. 2) दुपारी तालुक्‍यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, संशियत आरोपीने घरात आणि आजूबाजूला कोणी नसल्याची संधी सांधून जवळच खेळत असलेल्या तीन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून घरात बोलवून घेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एका मुलीने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्या मुलीने तत्काळ हा प्रकार घरी सांगितला होता. त्यानंतर इतर लोकांनी आरोपीच्या घराकडे धाव घेत इतर दोन मुलींची सुटका केली. त्यानंतर आरोपीला पंढरपूर तालुका ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी मंगळवारी रात्रीच उशिरा आरोपी सुखदेव बोंगे याच्या विरोधात पोक्‍सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

आज (बुधवारी) दुपारी येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता, त्याला 6 फेब्रवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. वलेकर हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT