murder sakal
सोलापूर

Solapur Murder: आत्याच्या पतीचा संशयावरून खून, खिलारवाडी येथील खळबळजनक घटना

Murder: गजेंद्र यांनी फोन उचलला नाही. गाडी पुढे आली असता त्यांना गजेंद्र शिंदे दुचाकीवरून येताना दिसले.

सकाळ वृत्तसेवा

Latest Solapur News: आत्याच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खिलारवाडी (ता. सांगोला) येथील तरुणाने आत्याच्या पतीचा डोक्यात लोखंडी पाइपने मारून खून केला. ही घटना मंगळवार (ता. २७) रोजी सायंकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान घडली.

याबाबत मृताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे (रा. खिलारवाडी) याने सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत सौरभ शिंदे यांनी म्हटले आहे, की मंगळवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मामेभाऊ सागर इंगोले हा घरी आला. सौरभ शिंदे यांचे वडील गजेंद्र विश्वनाथ शिंदे (वय ५५) यांचे अनैतिक संबंध असून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

यावेळी घरात गजेंद्र शिंदे सापडले नसल्याने सागर रागाने घराबाहेर पडला. गजेंद्र शिंदे यांचे मित्र गोपाळ चव्हाण व मुबारक मुलाणी हे दोघे त्याला भेटले. या दोघांना सागरने जबरदस्तीने गाडीत बसवून घेतले. या दोघांना गजेंद्र शिंदे यांना फोन लावून बोलावून घेण्यास सांगितले. मात्र गजेंद्र यांनी फोन उचलला नाही. गाडी पुढे आली असता त्यांना गजेंद्र शिंदे दुचाकीवरून येताना दिसले.

गजेंद्र शिंदे यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने सागर इंगोले यांनी गाडीत बसविले. तेथून ही गाडी गादेगाव, वाखरी, कराड रोड या भागात वेगाने फिरविली. पुढे शिरभावी (ता. सांगोला) गावातील वनीकरणात सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान गजेंद्र शिंदे यांना गाडीतून खाली बोलावून घेतले व डोक्यात लोखंडी पाइपने जोराने मारून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पवन मोरे हे या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी सागर इंगोले यास अटक करण्यात आली आहे.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT