Swamabhimani Shetkari Sanghatana has warned Damaji factory to declare sugarcane with FRP of 14 per cent, otherwise there will be indefinite protest at the entrance of Damaji factory. 2.jpg 
सोलापूर

'दामाजी कारखान्याने एफआरपी 14 टक्केसह ऊसदर जाहीर करावा, अन्यथा बेमुदत आंदोलन'

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) :  गाळप केलेल्या उसाची एफ आर पी प्लस 14 टक्के रक्कमेसह ऊसदर जाहीर करावा, अन्यथा दामाजी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर शेकडो शेतकऱ्यांसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

यंदाच्या गाळप हंगामामध्ये तालुक्यातील चार साखर कारखाने आहेत. त्यापैकी एक साखर कारखाना बंद असून तीन साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करता गाळप सुरू केले. त्यांनी जवळपास पाच लाखापेक्षा अधिक मेट्रिक टन उसाचे गाळप केले. दर जाहीर करावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मरवडे येथे ट्राॅली जाळण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रकार शेतकऱ्याकडून बालाजीनगर येथेही झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक घेत, त्या बैठकीत १५ तारखेपर्यंत याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याच्या सूचना दिल्या असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याबाबतचे निवेदन दामाजी कारखान्याकडे दिले. 

त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गाळप केलेल्या उसाची तोडणी केल्यापासून 14 दिवसाच्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक असताना या नियमांचे पालन केले नाही. तरीही दोन दिवसात एफ आर फी प्लस 14 टक्के दर जाहीर करावा, अशी मागणी या निवेदनात नमूद केली. निवेदनावर पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे ॲड राहूल घुले, रोहित भोसले, दत्तात्रय गणपाटील, पांडुरंग बाबर, सुरेश बाबर, राहुल खांडेकर, दत्तात्रय गडदे यांच्या सह्या आहेत.

यंदाच्या हंगामात एफआरपीसह ऊस दर जाहीर करण्याबाबत दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली असून त्या बैठकीला कार्यवाही लवकरच करण्याबाबत ठरले आहे. अध्यक्ष सध्या परगावी गेले असून ते दौऱ्यावरून परत येतील, त्यावेळी याविषयासंदर्भात बैठक घेऊन तत्काळ हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
- झुंझार आसबे, कार्यकारी संचालक, दामाजी साखर कारखाना

संपादन - सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT