Swami Samarth Mandir 
सोलापूर

अक्कलकोटचे वटवृक्ष स्वामी मंदिर राहणार 2 जानेवारीपर्यंत बंद ! मंदिर समितीने घेतला निर्णय 

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिर शुक्रवारी (ता. 25) मध्यरात्रीपासून ते 2 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा बंद करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन वटवृक्ष देवस्थान समिती करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच स्वामी भक्तांनी दर्शनासाठी मंदिराकडे येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात 25 डिसेंबर ते 2 जानेवारीअखेर नाताळ सुट्या, दत्तजयंती व नूतन वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता आहे. तसेच यंदा शुक्रवारी (ता. 25) नाताळ सणाची सुटी, शनिवार 26 व रविवार 27 डिसेंबर रोजी सलग शासकीय सुट्या आल्या आहेत. मंगळवारी (ता. 29) श्री दत्त जयंती आहे. गुरुवारी (ता. 31) सरत्या वर्षास निरोप व शुक्रवारी (1 जानेवारी 2021) नूतन वर्षाची सुरवात आदी सलग गर्दीचे दिवस लक्षात घेऊन कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने शनिवार, 2 जानेवारी 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाई करण्याचे लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. 

त्यानुसार शुक्रवारी (ता. 25) मध्यरात्रीपासून ते 2 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरिता मंदिराकडे येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी, असे आवाहनही श्री. इंगळे यांनी याप्रसंगी स्वामी भक्तांना केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: गेवराईत राडा! अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकरांवर हल्ला

Pune News : ‘बदनामी करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी’; सूत्रधाराचाही शोध घेणार- आमदार चित्रा वाघ

Latest Marathi News Live Update : ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Video : भल्यामोठ्या नंदीवर बसून प्राजक्ता-शंभूराजची रिसेप्शनला ग्रँड एंट्री ! थाटात झालं स्वागत

Pune News : कात्रज उद्यानातील ऑनलाईन बुकिंगला प्रतिसाद; दोन वर्षांत ५ लाख ४४ हजार ६३ पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंग!

SCROLL FOR NEXT