गवंडी काम करणारा स्वामींनाथ झगडतोय गंभीर आजाराशी
गवंडी काम करणारा स्वामींनाथ झगडतोय गंभीर आजाराशी 
सोलापूर

गवंडी काम करणारा स्वामींनाथ झगडतोय गंभीर आजाराशी

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : अक्कलकोट शहरात खासबाग येथे राहणारा व गवंडी काम करणारा स्वामींनाथ गवंडी हा सध्या मेंदूला झालेल्या गाठीने आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने गंभीर आजाराशी झगडत आहे.शस्त्रक्रिया करण्यासाठी कर्जबाजारी होऊन पाच लाख रुपये खर्च केला पण आता वर्षभर कामही करता येत नाही आणि औषधोपचारासाठी पैसेही नाही अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांनी आर्थिक मदत केल्यास स्वामींनाथ या आजारातून लवकर सावरून काम करू शकेल आणि आपल्या संसाराचा गाडा पूर्वीसारखा व्यवस्थित हाकू शकेल अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

अक्कलकोट शहरात राहणारा स्वामींनाथ बांधकामावर मिस्त्रीचे काम करीत असतो तो मुंबईत सर्व प्रकारचे बांधकाम करून आपला संसार सांभाळत आहे. अचानक एप्रिल महिन्यात डोके दुखी व चक्कर यायचे सुरू झाले त्याने तो दवाखाना दाखविला पण डॉक्टरने सांगितले की उन्हात कामे करता असे होत असेल पण त्रास वाढतच गेला आणि अधिक तपासणी केली असतात मेंदूला गाठ झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. आजपर्यंत त्याला एकूण पाच लाख रुपये खर्च आले त्यासाठी सर्व रक्कम मिळेल त्या अवास्तव व्याज दराने काढावी लागली तसेच अंतिम टप्यात आणखी खर्च वाढल्याने स्वतःचे राहते घरही दुसऱ्यांना लिहून दिले असल्याने सध्या ते प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहे.

सध्या स्वामींनाथ यांच्या चार वर्षाच्या मुलालाही हाच आजार झाला आहे पण त्याच्या दरमहा औषधोपचार खर्च पुण्याची एक संस्था मोफत करीत आहे आणि बारा वर्षानंतर त्याच्यावरही शस्त्रक्रिया करावे लागणार आहे. आता स्वामींनाथ यांचा दरमहा औषधोपचार खर्च 5000 रुपये एवढा आहे आणि तो त्या कुटुंबास झेपनासे झाले आहे. पैशाअभावी गोळ्या न घेतल्याने त्रास आणखी थोडा वाढल्याचे जाणवत आहे.

हे घर सावरण्यासाठी स्वामींनाथ यांची वयस्कर आई आता हॉटेलमध्ये कामास जाऊन घर चालवीत आहे. आता स्वामींनाथ यांच्या कुटुंबाला यातून सावरण्यासाठी विविध सामाजिक संघटना व दानशूर व्यक्ती यांनी मदत करण्याची गरज आहे.असे झाले तरच त्याचे आरोग्य सुधारून ते पूर्वीसारखे पुन्हा काम करून उभारी घेऊ शकणार आहे, अन्यथा आर्थिक ओढताणापायी कुटुंबाचा त्रास आणखी वाढणार आहे.

सध्या मेंदूच्या आजाराने मी त्रस्त आहे त्याला पाच लाख रुपये खर्च आला आहे.आता औषधोपचार करण्यासाठी माझी आर्थिक स्थिती योग्य नाही. आणखी वर्षभर काम करायचे नाही असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.यातून सावरण्यासाठी मला सद्या मदतीची गरज आहे

- स्वामींनाथ गवंडी

मदत खालील क्रमांकावर करावे असे आवाहन करण्यात आले आहे

आपल्या इच्छेनुसार मदत करावी.

फोन पे नंबर- 9657909340

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

अकाउंट नंबर - 3651821957

IFSC SBINO284661

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT