सोलापूर

माढा तालुक्‍यातील कन्हेरगाव परिसरात बिबट्यासदृष्य प्राण्याचा धुमाकूळ 

वसंत कांबळे

कुर्डू : कन्हेरगाव-दहिवली (ता. माढा) येथी शिवारात बिबट्यासदृष्य प्राण्याची दहशत निर्माण केली असून बुधवारी रात्री कन्हेरगाव येथील नवनाथ रंगनाथ डोके यांची शेळी बिबट्यासदृष्य प्राण्याने फस्त केली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण पसरले आहे. 

गुरुवारी दुपारी दहिवली-केम रोडच्या पूर्वेला सातपुते वस्तीतील एका महिलेने प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याचे येथील ग्रामस्थ सांगत होते. त्यानंतर बिबट्या उसात पळून गेला. तर सदर महिला घाबरून घरी पळत सुटली. गेल्या दहा दिवसात निमगाव, दहिवली, उपळवटे, कंदर, कन्हेरगाव, ढवळस, शेडशिगे, सातोली या गावातील शिवारात बिबट्याचा वावर आहे. मंगळवारी रात्री दहिवली येथील उज्वला निवास खोचरे याची शेळी बिबट्यासदृष्य प्राण्याने फस्त केली असून या आठवड्यात निमगाव 2 दहिवली 1 व कंदर येथे दोन शेळ्या तर कन्हेरगाव येथे एक शेळी खाल्ली आहे. या परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे तर शेतामध्ये रहाणारे लोक जीव मुठीत घेउन वावरत आहेत. यामुळे शेतात मजुरी करण्यासाठी कोण धाडस करत नाहीत. वन खात्याने मात्र फक्त दोन ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी सापळा लावला आहे. गुरुवारी दुपारी कन्हेरगाव येथे डोके यांच्या वस्तीवर वनसेवक हरिभाऊ मोरे, तानाजी अटकळे, शिवाजी दळवी, अशोक यादव यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ते ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगितले. 

बिबट्या पकडावा 
वनखात्याने या बिबटयाचा प्रभावीपणे बदोबस्त करून बिबट्या पकडावा व शेतकऱ्यांची भितीमधून सुटका करावी. 
-तय्यब जहागिरदार, सरपंच, दहिवली 


संपादन ः संतोष सिरसट 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT