congres andolan.jpeg 
सोलापूर

शेतकरी आंदोलनाला देशविरोधी म्हणणाऱ्या राबसाहेब दानवे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

अरविंद मोटे

सोलापूर : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याची टिका केंद्रीय राज्य मंत्री तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचा संताप अनावर झाला असून या वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर शहर युवक कॉंग्रेच्या वतीने निषेध व्यक्त केला. रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सेवादल प्रदेश पदाधिकारी अशोक कलशेट्टी, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, राहुल गोयल, संतोष अट्टेलुर, विवेक इंगळे, अभिषेक गायकवाड, शाहु सलगर, सुभाष वाघमारे, किरण राठोड, धम्मा जगझाप, जावेद कुरेशी, आनंद भंडारे, शिव कोरे, अनवर शेख उपस्थितीत होते. जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून नरेंद्र मोदी आणि राबसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली. 

इंधन दरवाढीचाही निषेध 
मोदी सरकार सातत्याने गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ करत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. स्वयंपाकाचा गॅस नुकताच पन्नास रुपयांनी महागला आहे. या दरवाढीचा कॉंग्रसेच्यावीतने निषेध करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारने तात्काळ गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 

संपादन : अरविंद मोटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT