T20 Championship: winner of Mumbai Police team
T20 Championship: winner of Mumbai Police team 
सोलापूर

शरद चषक टी-20 स्पर्धा : मुंबई पोलिस संघ विजेता 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सोलापूर आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शरद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई पोलिस संघाने सोलापूर ऍकॅडमी संघावर विजय मिळवत शरद चषक पटकाविला. 

पारितोषिक वितरण समारंभ 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख अध्यक्षस्थानी होते. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, आयोजक किशोर माळी, स्पर्धा प्रमुख प्रशांत बाबर, माजी महापौर नलिनी चंदेले, विनोद भोसले, सुभाष राऊत आदी उपस्थित होते. या वेळी पंकज भुजबळ, महेबुब शेख, सक्षणा सलगर यांनी मनोगत व्यक्त केले. 

अंतिम सामना मुंबई पोलिस व सोलापूर ऍकॅडमी 
अंतिम सामन्यात मुंबई पोलिस संघ एकहाती सोलापूर ऍकॅडमी संघावर विजय मिळवत शरद चषक व एक लाख रुपयांचा मानकरी ठरला. प्रथम सोलापूर ऍकॅडमीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 17.1 षटकांत सर्वबाद 95 धावाच करू शकला. निखील मादास 19, राजेश येमूल 14, हणमंतु पुजारीने 13 धावा केल्या. मुंबई पोलिस संघाकडून पुष्कराज चव्हाणने 22 धावांत सहा बळी, सागर मुळेने 19 धावांत दोन बळी घेतले. मुंबई पोलिस संघाने 95 धावांचे लक्ष्य सहज पार केले. मुंबई पोलिस संघाने 14.1 षटकांत पाच बाद 96 धावा केल्या. मुंबई पोलिस संघाकडून पुष्कराज चव्हाणने 49, स्वप्नील कुळेने 41 धावा केल्या. सोलापूर ऍकॅडमी संघाकडून सत्यजित जाधवने 15 धावांत दोन बळी, राजेश येमूल व सचिन चौधरी यांनी 1-1 बळी घेतले. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार पुष्कराज चव्हाण याला मिळाला. विजयी संघास एक लाख रुपये रोख, उपविजयी संघास 51 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या संघास 25 हजार रुपये व शरद चषक देण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप कुसेकर, विशाल कुलकर्णी, शंकर पवार, ग्यानबा सुरवसे यांनी परिश्रम घेतले. 

स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे 

  • उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर : प्रवीण देशेट्टी (साऊथ सोलापूर आपटे ग्रुप) 10 हजार व चषक 
  • उत्कृष्ट गोलंदाज : सत्यजित जाधव (सोलापूर ऍकॅडमी) 10 हजार व चषक 
  • उत्कृष्ट यष्टीरक्षक : रोहित पोळ (मुंबई पोलिस) 10 हजार व चषक 
  • उत्कृष्ट क्षेत्ररक्षक : अनिष चौधरी (अभिसिद्ध) 10 हजार व चषक 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

SCROLL FOR NEXT