21Corona_20akola_2001_1_2.jpg 
सोलापूर

कुटुंबाची घ्या काळजी ! उपचारासाठी विलंब केल्याने दोघांचा मृत्यू; शहरात 39 रुग्णांची वाढ

तात्या लांडगे

सोलापूर : 'कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत सर्वांनी स्वत:सह कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, अजूनही ही मोहीम कागदाबाहेर आलेली दिसत नाही. आज शहरातील भिमा नगर (जुळे सोलापूर) येथील 80 वर्षीय महिलेचा आणि राघवेंद्र नगरातील (सैफूल) 72 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात विलंबाने दाखल झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या रिपोर्टनुसार स्पष्ट होते.

ठळक बाबी...

  • शहरात आतापर्यंत 12 हजार 456 व्यक्‍ती कोरोना बाधित
  • एकूण रुग्णांपैकी 11 हजार 441 जणांनी कोरोनावर केली मात
  • आतापर्यंत कोरोनामुळे 661 रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू
  • शहरातील 354 रुग्णांवर सध्या सुरु आहेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार
  • रुग्णांच्या संपर्कातील 91 संशयित होम क्‍वारंटाईन तर 23 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन

शहरात आज (ता. 1) शिवम अपार्टमेंट, महेश सोसायटी (सम्राट चौक), रचना सोसायटी, भिमा नगर, विशाल नगर, मधुबन नगर (जुळे सोलापूर), रुपाभवानी मंदिर रोड (पुना नाका), मड्डी वस्ती (भवानी पेठ), मंगळवार पेठ, ओमगर्जना चौक, साई-ईश्‍वर सोसायटी, सुशिल नगर, सिध्देश्‍वर नगर, विद्या नगर, नम्रता सोसायटी (विजयपूर रोड), आदर्श नगर (सदर बझार), चाकोते नगर (शेळगी), सनसिटी, अवंती नगर (मुरारजी पेठ), कन्ना चौक परिसर (भवानी पेठ), लक्ष्मी मार्केटजवळ, निर्मिती विहार (शाहीर वस्ती), सोनिया नगर, पश्‍चिम मंगळवार पेठ, एकता नगर, जुना विडी घरकूल, गुरुनानक नगर, बुधवार पेठ, मौलाली चौक, जिल्हा न्यायालयाजवळ, साईनाथ नगर (मजरेवाडी) या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. आज (सोमवारी) शहरातील 614 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात रॅपिड टेस्टमध्ये सात तर आरटीपीसीआर टेस्टमध्ये 32 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना वाढू नये म्हणून नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग व हाताची स्वच्छता ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून वांरवार केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

Beed News: रॉकेल तर मिळेल हो, पण स्टोव्ह आणायचा कोठून?; गृहिणींना पडला प्रश्न; पुन्हा एकदा स्टोव्ह शोधण्यासाठी महिलांच्या हालचाली झाल्या सुरू

Sadashivgad Fire: सदाशिवगडावरील वनसंपदा आगीत खाक; अंदाजे ३०० झाडे होरपळली, शिवप्रेमींनी वणव्याच्या प्रकाराबाबत निषेध!

SCROLL FOR NEXT