sand 
सोलापूर

ताकमोगेंच्या प्रतीक इन्फ्रास्ट्रक्‍चरला परत मिळणार वाळूचे आठ कोटी

प्रमोद बोडके

सोलापूर : वाळू लिलावात दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे येथील साठा क्रमांक 2 हा वाळू गट माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्या प्रतीक इन्फ्रास्ट्रक्‍चरला मिळाला होता. पंधरा कोटी रुपये इतक्‍या सर्वोच्च बोलीस त्यांना हा ठेका मंजूर करण्यात आला होता. नदीमध्ये पाणी असल्याने वाळू उत्खनन शक्‍य नसल्याने ताकमोगे यांच्या प्रतीक इन्फ्रास्ट्रक्‍चरला आठ कोटी 69 लाख 39 हजार चारशे दहा रुपये परत करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे. 

ही रक्कम परत करण्याबाबतचे पत्र महसूल विभागाने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. ताकमोगे यांना येथील ठेका मिळाल्या त्या दरम्यान भीमा नदीत उजनी व वीर नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. नदीपात्रात 25 ते 30 फूट पाणी वेगाने वाहत असल्याचे नैसर्गिक सबळ कारण असल्याने त्यांना नदीतून वाळू उत्खनन करता आले नाहीत. ठेका घेऊनही उत्खनन करता येत नसल्याने 6 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत साठा केलेले परिमाण, प्रत्यक्ष विक्री केलेले परिमाण, लिलाव धारकास मंजूर केलेल्या एकूण परिमाणामधून वजा जाता शिल्लक राहिलेल्या वाळूच्या परिणामाबाबत प्रमाणशीर रक्कम परतावा करण्याचे या बैठकीत ठरले होते.

त्यानूसार जिल्हास्तरिय समितीने याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाला पाठविला होता. न्यायालयाचा स्थगिती आदेश आणि भीमा नदीपात्रात असलेली पूरस्थिती (नैसर्गिक आपत्ती), जिल्हास्तरीय समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला आहे. लिलाव धारकास वाळू गटातून उत्खनन न करता आलेल्या वाळूचे प्रमाण निश्‍चित करुन आठ कोटी 69 लाख 39 हजार चारशे दहा रुपये परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT