Talathi recruitment in Solapur district is still incomplete 
सोलापूर

नियुक्त्या मिळत नसल्याने भावी तलाठ्यांचा जीव टांगणीला

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनात तलाठी संवर्गातील 84 पदासाठी 2019 मध्ये राबविलेली भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही. संभाव्य निवड यादीत आलेल्या भावी तलाठ्यांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे.
 जिल्हा प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात व्यस्त असल्याने आम्हाला नियुक्त मिळणार तरी कधी? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तलाठी संवर्गातील 84 पदांसाठी जुलै 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांनी 20 डिसेंबर रोजी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर परत तीन महिन्यांनी संभाव्य प्रारुप यादी 26 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी 5 मार्च रोजी निश्चित करण्यात आली होती त्यानुसार 5 मार्च रोजी कागदपत्रांची पडताळणीही झाली. त्यानंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासन संपूर्णपणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यस्त राहिले आहे. तेव्हापासून रखडलेली प्रक्रिया कधी पूर्ण होणार?  नियुक्त्या कधी मिळणार? यासह अनेक प्रश्नांनी भावी तलाठ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण केला आहे. सोलापूर सोबत राज्यातील इतर जिल्ह्यातीलही तलाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या आहेत. चार ते पाच महिन्यांचा पगारही त्यांनी घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र ही प्रक्रिया का पूर्ण होत नाही? या प्रश्नाचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. दोन-तीन महिने परीक्षार्थींनी पाठपुरावा केल्यानंतर या परीक्षेचा निकाल लागला होता. आता नियुक्त मिळण्यासाठी कोणाकडे आणि कसा पाठपुरावा करायचा?  याच्या शोधात भावी तलाठी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT