सोलापूर

सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरात 12 एप्रिल रोजी कोरोना बाधितचा पहिला रुग्ण आढळला. अवघ्या दीड ते पावणे दोन महिन्यात सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली आहे तर हे 46 जणांचा मृत्यू (स्थिती शनिवार सायंकाळपर्यंतची) झाला आहे. सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन सदस्यीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

सोलापूर शहरातील दोन खासगी तज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. डॉ. फिरोज सय्यद व डॉ. अमोलकुमार अचलेकर या खासगी डॉक्टरांची सेवा व मार्गदर्शन घेतले जाणार आहे. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोव्हिड कक्ष विभागाच्या प्रमुखांनी ही दोन नावे सुचविली आहेत. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचा आज आदेश काढला आहे. पुढील आदेश होईपर्यंत या दोन्ही डॉक्टरांच्या सेवा जिल्हा रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिगृहीत करण्यात आल्या आहेत.

टास्क फोर्स मधील हे दोन्ही डॉक्टर डेथ ऑडिट कमिटी, सोलापूर महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत.  सोलापुरात 12 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि हा रुग्ण मृत झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर सोलापुरातील शास्त्रीनगर, तेलंगी पाछा पेठ, नइ जिंदगी, भारतरत्न इंदिरा नगर या भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. कमी कालावधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने सर्वांच्या चिंतेचा विषय झाला आहे. तसेच आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असल्याने सोलापुरातील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करण्याचे काम हे टास्क फोर्स काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT