सोलापूर

......अखेर सोलापूर महापालिकेतील कर भरणा केंद्र सुरु

विजयकुमार सोनवणे

सोलापूर :  मिळकत कर भरण्यासाठी महापालिकेत तीन केंद्र आज सोमवारपासून सुरु करण्यात आले.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती दक्षता घेऊन कर वसुलीचे नियोजन करण्यात आले आहे. 23 मार्चपासून महापालिकेत कर भरण्याची सुविधा बंद करण्यात आली होती, अशी माहिती शहर कर संकलन प्रमुख प्रदीप थडसे आणि हद्दवाढ विभागाचे प्रवीण दंतकाळे यांनी सांगितले. 


कोरोना प्रादुर्भावाचा मोठा आर्थिक फटका महापालिकेस बसला आहे. गेल्या दोन महिन्यांत फक्त दोन कोटी 39 लाख रुपयांचा भरणा तिजोरीत झाला आहे. मिळकत कराखालोखाल आरोग्य विभाग आणि विद्युत दाहिनीपासूनचे उत्पन्न सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यात फक्त आरोग्य आणि विद्युत दाहिनीचे उत्पन्न होते, यंदा त्यात मिळकत कराच्या उत्पन्नाची भर पडली आहे. याशिवाय, मुद्रांक शुल्कापोटी मिळालेले अनुदान आणि ठेवीवरील व्याजापोटीचे दोन कोटी 93 लाख 49 हजार 407 रुपये मिळाले आहेत. शहरातील सर्वच मिळकतदारांकडे ऑनलाइन कर भरण्याची सुविधा नाही, त्यामुळे महापालिकेतही कर भरण्याची व्यवस्था करण्यास मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव कर संकलन विभागाने दिला होता. 


महापालिकेस एकूण 17 विभागांकडून उत्पन्न मिळते. त्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न हे मिळकत कर, गलिच्छ वस्ती सुधारणा, हद्दवाढ, भूमी व मालमत्ता, मंडई, उद्यान, स्मृती मंदिर, अभिलेखापाल या विभागांकडून मिळते. मात्र, मे महिन्यात 17 पैकी आठ विभागांकडून शून्य रुपये उत्पन्न मिळाले आहे. यंदा महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी आरोग्य विभाग, नगरअभियंता (विद्युत दाहिनी) आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता या विभागाची मदत झाली आहे. आरोग्य विभागाकडून दोन लाख 67 हजार 290 रुपये तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दोन लाख 53 हजार 520 रुपये उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढावे आणि नागरिकांची सोयही व्हावी या हेतूने महापालिकेतील नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

ऑनलाइन कर भरल्यास सहा टक्के सवलत 
महापालिकेने 2020-21 या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले वाटण्यास सुरवात केली आहे. चालू वर्षाचे बिल थेट भरल्यास पाच टक्के तर ऑनलाइन भरल्यास सहा टक्के सवलत मिळणार आहे. 31 जुलै 2020 पर्यंत ही सवलत असणार आहे. थकबाकी असलेल्या मिळकतदारांना ही सवलत मिळणार नाही. ऑनलाइन पेमेंटसाठी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर सुविधा करण्यात आली आहे. बिले न मिळाल्यास महापालिकेच्या याच संकेतस्थळावरून आपल्या मिळकतीचा क्रमांक टाकून बिले डाऊनलोड करून घ्यावीत. मिळकतकराच्या बिलावर क्‍यूआर कोडचीही सुविधा असल्याने ऍप्सच्या मदतीने जागेवर बसून कर भरता येणार आहे. याशिवाय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटीनेही भरणा केल्यास सहा टक्‍क्‍यांची सवलत मिळणार आहे. डिजिटल पेमेंटशिवाय कर भरणाऱ्यांना मात्र पाच टक्के सवलत मिळेल. 

या ठिकाणीही भरता येईल मिळकत कर 
एच.एस.आर. पाण्याची टाकी-डी मार्टजवळ, मजरेवाडी कर संकलन कार्यालय, बाळे कर संकलन कार्यालय, आर.सी.एच. शेळगी दवाखाना, विभागीय कार्यालय क्रमांक पाच, अक्कलकोट रस्ता एमआयडीसी कर संकलन कार्यालय आणि महापालिकेतील नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी कर भरण्याची सोय आहे. थकीत मिळकत करावर एक एप्रिल 2020 पासून आणि चालू बिलाची थकबाकी राहिल्यास एक ऑगस्टपासून महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दोन टक्के दंड लागणार आहे. 


सध्याच्या नियोजनानुसार बिल मिळो अथवा न मिळो रोख किंवा ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास प्रस्तावानुसार 31 जुलैपर्यंत पाच किंवा सहा टक्के सवलत मिळेल. थकबाकीदारांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. सध्या महापालिकेत दोन ऱोख भरणा आणि एक कार्डाद्वारे कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. 
- प्रदीप थडसरे, कर आकारणी व कर संकलन प्रमुख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT