Solapur Crime Esakal
सोलापूर

Solapur Crime: धक्कादायक! पत्नीसह मुलाची हत्या करून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; घटनेने बार्शी शहर हादरलं

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालूक्यात एका शिक्षकाने पत्नीसह मुलाचा निर्घृण खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

सोलापूर जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालूक्यात एका शिक्षकाने पत्नीसह मुलाचा निर्घृण खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉट येथे घडली आहे. अतुल मुंडे असे पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असल्याची माहिती आहे. मुंडे पती-पत्नी दोघेही शिक्षक होते. तर मुंडे यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल सुमंत मुंडे (वय 40), तृप्ती अतुल मुंडे (वय 35) ओम सुमंत मुंडे (वय 5) या तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अतुल मुंडे यांनी आधी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. त्यानंतर गळफास घेतं आपलं जीवन संपवलं आहे. अतुल मुंडे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा तपास आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT