pratapsinh mohite.jpg
pratapsinh mohite.jpg 
सोलापूर

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचवण्यासाठी शिक्षकाने केले विशेष प्रयत्न 

संतोष कानगुडे

पानगाव (सोलापूर)ः आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धामध्ये ग्रामीण विद्यार्थी पोहोचवण्यासाठी युनेस्को स्कूल क्‍लब, शाळा फाउंडेशन सारख्या संस्था स्थापन करत शनिवार माझा गोष्टीचा सारख्या विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक प्रतापसिंह मोहिते यांनी शालेय शिक्षणात प्रेरणादायी प्रयोग साकारले आहेत. 

प्रतापसिंह मोहिते यांनी शिक्षकच व्हायचंय म्हणून दररोज आठ किंलोमीटरची पायपीट करून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक आणि डिएडचा प्रवास करून 2005 साली शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. शिक्षक म्हणून काम करताना दोन राज्यस्तरीय पुरस्कारासह सात विविध पुरस्कार मिळवणाऱ्या उपक्रमशील शिक्षक प्रतापसिंह मोहिते यांच्या उल्लेखनीय शालेय उपक्रम राबवले. 

हळदुगे ता.बार्शी जि.सोलापूर सारख्या ग्रामीण भागातील मध्यवर्गीय कुटुंबातून मोहिते यांनी शिक्षण घेतले आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऐक्‍याची भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी शाळेत अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून बार्शीत प्रथमच युनेस्को स्कूल क्‍लबचे काम सुरु केले आहे. रचनात्मक अध्यापन पद्धतीने विद्यार्थांना ज्ञान आत्मसात करता यावे म्हणून विविध उपक्रमयुक्त वर्ग तयार केला आहे. या उपक्रमाचे कौतुक जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी करत मोहिते यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले होते. 
गुढीपाडवा पट वाढवा, शनिवार माझा गोष्टीचा, आनंद बाजार, ऐकू ध्यानाने लिहू आनंदाने असे एक ना अनेक उपक्रम ते सध्या राबवत आहेत. त्याचबरोबर आधुनिक ई लर्निग हा विषय अत्यंत काळजीपूर्वक हाताळून ते शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य करत आहेत. शाळा फाउंडेशन हि संस्था त्यांनी स्थापन केली. अल्प कालावधीत विविध उपक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे काम सध्या ते जोमाने करत आहेत. गरजू विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हि संस्था चांगले काम करत आहे. विद्यार्थांच्या ज्ञानात वाढ व्हावी यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीतही त्यांनी शाळा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध ऑनलाईन स्पर्धा घेतल्या आहेत. शैक्षणिक चळवळीत वेगवेगळे प्रयोग करत असलेले श्री. मोहिते हे सध्या साकत ता.बार्शी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना अध्ययन करणाऱ्या मोहिते यांचे प्रयोग शिक्षणक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT