सोलापूर

कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरल्या आता या महापालिका शाळांतील शिक्षिका (VIDEO)

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण रोज वाढतच आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांचा सर्व्हे करण्यासाठी आता महापालिका शिक्षण मंडळाकडील शिक्षिकांना रणांगणात उतरविण्यात आले आहे. या शिक्षिका आता शहराच्या विविध भागात जाऊन तेथील नागरिकांचा सर्व्हे करणार आहेत. 

या शिक्षिकांना महापालिकेचे आरोग्याधिकारी डॅा. संतोष नवले यांनी सर्व्हेक्षणाची माहिती दिली. कशा पद्धतीने सर्व्हेक्षण करायचे आहे, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्यात याबाबत माहिती दिली. यावेळी प्रशासनाधिकारी कादर शेख उपस्थित होते. 

दरम्यान सध्या सुरु असलेला सर्व्हे हा दिखावा असून, केवळ नावे नोंदवून घेतली जात आहेत. संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणी आजारी आहे का याचीही विचारणा केली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तपासणी केलेल्या प्रत्येक घरातील व्यक्तीची सविस्तर माहिती अहवालात नमूद करण्याच्या सूचना या शिक्षिकांना देण्यात आल्या आहेत. 

सारी सर्वेक्षण 
शहरातील गजबजलेल्या सर्व जागी महानगरपालिकेच्या ५२ पथकांमार्फत SARI (Severe acute respiratory illness) म्हणजे सर्दी खोकला ताप इत्यादी बाबींचा सर्व्हे करण्यात येत आहे या पथकामध्ये एक आशा सेविका व एक कर्मचारी समाविष्ट आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
*नागरी आरोग्य केंद्रे - १४
*कुटुंब संख्या -२०५५४३
*व्यक्तींची संख्या -९९६१७३
*सर्दी ताप खोकला व्यक्तींची संख्या - २३७
*यूपीएचसी संदर्भित संख्या -१९

फिव्हर ओपीडी 
मनपा कम्युनिटी हेल्थ क्लिनिक, यूपीएससी, डिस्पेन्सरी अशा एकूण २३ ठिकाणी दिनांक ८ एप्रिलपासून फिवर ओपीडीची व्यवस्था करण्यात आली असून दिनांक १ मे अखेर एकूण ४२३०रुग्णांना तपासण्यात आले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरल्या शिक्षिका (VIDEO) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT