Teacher 
सोलापूर

वेतन अनुदान परत जाण्याची भीती ! प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावे वेतन अदा करण्याचे पत्र

संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार जिह्यातील अंशत: अनुदानित शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्यांना 40 टक्के अनुदान घोषित झाले आहे. नोव्हेंबर 2020 पासून मार्च 2021 पर्यंत 40 टक्के वेतनाचे आदेश पारीत झाले आहेत. जिल्ह्यातील 18 शाळेतील 83 शिक्षकांना याचा लाभ होणार आहे. शिक्षणाधिकारी यांनी वेतन पथक कार्यालयाला याबाबत अद्याप कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे वेतन पथक कार्यालयाने संबंधित शाळांना वेतन देयके सादर करण्याचे आवाहन केले नाही. त्यामुळे शासनाने दिले पण प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे शिक्षकांना लाभ मिळतो की निधी परत जातो? या चिंतेने शिक्षक ग्रासले आहेत. 

वेतन पथक अधीक्षक कोरोना पॉझिटिव्ह व लिपिक वैद्यकीय रजेवर यामुळे वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार की निधी परत जाणार, या काळजीत शिक्षक आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबतीत तातडीने आदेश काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सुनील चव्हाण यांनी दिली. या वेळी मुरलीधर कडलासकर, वीरभद्र यादवाड, अ. गफूर अरब उपस्थित होते. 

मागील पाच वर्षांपासून वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वेतन शिक्षकांना मिळण्याची शक्‍यता कमी झाली आहे. 20 टक्के अनुदान प्राप्त शिक्षकांना वेतन निश्‍चिती करणे, देयके सादर करणे इतक्‍यात शक्‍य नाही. ही सर्व प्रक्रिया करण्याइतपत सध्या वेळ नाही. त्यामुळे त्यांना वेतन अदा करावे. निधी परत जाऊ नये, यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत. 
- सुनील चव्हाण, 
प्रदेश सचिव, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT