सोलापूर

या कारणांसाठी शिक्षक परिषदेचे अन्नत्याग उपोषण 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने शिक्षण विभागाच्या प्रलंबित मागण्यांबाबत एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केले. संघटनेचे नेते जितेंद्र पवार यांनी स्वःताच्या घरी आंदोलन केले. 

अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकड्यावरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक एप्रिल 2019 पासून 20 टक्के वेतन अनुदान तसेच अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एक एप्रिल 2019 पासून 20 टक्के वाढीव वेतन अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय तत्काळ काढावा. अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढून अनुदानास घोषित करुन अनुदान द्यावे, उच्च माध्यमिक शाळातील 2003 ते 2019 या कालावधीत प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता देऊन अनुदान वितरित करणे. टीईटीग्रस्त शिक्षकांचे जानेवारी 2020 पासून रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मोकळे करणे. अपंग समावेशीत शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचरिकाना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन देऊन त्यांचे अन्यत्र समायोजन करणे. आठ हजार संगणक शिक्षक /निर्देशकांना पूर्ववत सेवेत रुजू करणे. 
रात्र शाळेला पूर्ण शाळेचा दर्जा देणे या प्रमुख मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार, प्रांत सदस्य बाबासाहेब काळे, विभाग कार्यवाह सोमनाथ राठोड, विभाग उपाध्यक्ष सुरेश राठोड, विभाग कार्यालयमंत्री बाळासाहेब शिंगाडे, शहराध्यक्ष मोहन पाटील, शहर कार्यवाह मारुती तोडकर, जिल्हाध्यक्ष विनायक कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह परमेश्‍वर गायकवाड, जिल्हा कोषध्यक्ष आदम मुजावर, शहर कोषध्यक्ष बापू माने हे सहभागी झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT