Bird Flue 
सोलापूर

पशुसंवर्धन विभागाकडून दक्षता ! "बर्ड फ्लू' सर्वेक्षणासाठी आजपासून होणार जंगलगी परिसरात पथके कार्यान्वित

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हाधिकाऱ्यांनी जंगलगी परिसरातील दहा किलोमीटर एरिया ऍलर्ट झोन म्हणून जाहीर केल्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून आजपासून पथके कार्यान्वित करून सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती तालुका पशुधन अधिकारी गोविंद राठोड यांनी दिली. 

जंगलगी येथील कोंबड्या बर्ड फ्लूसदृश आजाराने मरण पावल्यामुळे बर्ड फ्लू नियंत्रणासाठी या भागातील चिकन विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याबरोबरच कोंबड्यांची विक्री व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये असलेल्या सलगर बुद्रूक येथील बाजारात देखील कोंबड्यांची विक्री व खरेदी करता येणार नाही. जंगलगीपासून दहा किलोमीटर अंतरामध्ये बावची, सलगर खु, सलगर बु, हुलजंती, पौट, शिवणगी, चिक्कलगी, जित्ती, निंबोणी, येळगी, मारोळी, लवंगी, शिरनांदगी या गावांच्या हद्दी येत आहेत. त्यामुळे या गावांतील कोंबडीपालन केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कोंबड्या मृत झाल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. 

सध्या कोंबड्यांसाठी असलेले पशुखाद्य न वापरता घरगुती पशुखाद्य कोंबड्यांसाठी वापरावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, पशुसंवर्धन विभागाकडे 2019 नुसार कोंबड्यांची संख्या उपलब्ध आहे. सुधारित संख्या किती आहे, याबाबतची माहिती नाही. त्यामुळे सर्वेक्षणाअंती या परिसरातील कोंबड्यांची संख्या स्पष्ट होणार आहे. 

परंतु, बर्ड फ्लूसदृश आजाराने कोंबड्या मरण पावल्याने या भागात खळबळ उडाली आहे. या भागातील शेतकरी व व्यावसायिकांनी कर्जरूपाने भांडवल उभारून कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु जंगलगी येथील कोंबड्या मृत्युमुखी पडल्याच्या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असून, यामुळे उत्पादक व विक्रेते अधिकच अडचणीत सापडले आहेत. पोल्ट्री उत्पादकांना पशुसंवर्धन विभागाने तत्काळ दिलासा देऊन हा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या दृष्टीने उपाययोजना व या रोगाचा प्रादुर्भाव न वाढण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT