सोलापूर

"तेजस्विनी'ने पेटविल्या 1200 कुटुंबातील चुली 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : लॉकडाऊनमुळे श्रीमंत आणि मध्यमवर्गीय हैरान झाले आहेत. अशा स्थितीत दैनंदिन उत्पन्न मिळवून उपजिविका करण्याची वेळ ज्यांच्यावर आहे, अशा सुमारे 1200 कुटुंबियांना राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित तेजस्विनी महिला उद्योग समुहाने जीवनावश्‍यक वस्तुंचे वाटप करून त्यांच्या घरातील चुली पेटविल्या. त्यासाठी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांनी पुढाकार घेतला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. सोलापुरात विविध सामाजिक संस्था आणि मंडळाच्यावतीने मदतीचे वाटप सुरूच आहे. परंतु अनेक घटक या मदतीपासून वंचित आहेत. अशा वंचित घटकांचा शोध घेऊन या संघटनेच्या वतीने त्यांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप केले. अन्नधान्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या या कुटुंबियांना या मदतीमुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी संयोजकांना मनापासून धन्यवाद दिले. 

सोलापूर रेल्वे स्टेशन वरील हमाल, बूट पॉलिश करणारे गटई कामगार, रिक्षाचालक आणि दररोज कचरा वेचून उपजीविका भागविणाऱ्या कचरा वेचक अशा गरजुंची यादी बनविण्यात आली. त्यानंतर त्यांना लक्ष्मी विष्णू चाळीत बोलावून धान्याचे किट वाटप करण्यात आले. त्यामध्ये गहू ,तांदूळ, साखर, तेल, पीठ,कांदा आणि पापड अशा प्रकारच्या साहित्याचा समावेश होता. 

यावेळी कोल्हे दांपत्यांसह मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, जयश्री माने, मंगेश डोंगरे ,राहुल काटे, रणजीत कोल्हे, अशोक पाटील, नागेश गायकवाड,सौदागर डोंगरे, हसन जमादार, रफिक देंगनाळकर ,गणेश भोसले,विजयसिंग भदोरिया, आरिफ निकेबान ,अनील शिवपुजे, योगेश पवार ,शंकर आयवळे, महादेव भोसले,युवराज घाडगे, युसुफ शेख आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव! दोन समाज आमनेसामने

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT