सोलापूर

सोलापूर : परवानगीसाठी दहा हजार डिपॉजिट; महापालिका आयुक्‍तांचा नवा फतवा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महापालिकेने बुधवारपासून नवे आदेश काढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महापालिकेने बुधवारपासून नवे आदेश काढले आहेत.

सोलापूर : मंगलकार्यालय, सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी परवानगी काढताना दहा हजार रुपयांची अनामत रक्‍कम महापालिकेत भरावी लागणार आहे. सभागृहात कोरोना नियमाचे उल्लंघन न केल्याचा व्हिडिओ महापालिकेकडे सादर केल्यानंतरच ती डिपॉजिट रक्‍कम देण्यात येईल, असा नवा फतवा आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी काढला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महापालिकेने बुधवारपासून नवे आदेश काढले आहेत. शहरात साधारण छोटी-मोठी ७० मंगलकार्यालये तर ४० सभागृह आहेत. आता लग्नसराईमुळे सर्वच मंगलकार्यालयात शुभकार्याचा बार उडत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर सभागृहात राजकीय कार्यक्रम धुमधडाक्‍यात सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमासाठी बंदिस्त सभागृहात १०० तर, खुल्या जागेत २५० व्यक्‍तींची मर्यादा घातली आहे. परंतु ही संख्या एकूण सभागृहाच्या २५ टक्‍के इतकी असणे अपेक्षित आहे. तसा आदेशही महापालिकेकडून काढण्यात आला. महापालिकेकडून सूचना देऊनही शहरात या आदेशाचे पालन होताना दिसून येत नाही. बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे.

दंडात्मक कारवाईमध्येही कर्मचाऱ्यांकडून सातत्यपणा नसतो. कारवाईत समतोलपणा राहावा. ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांना दंड झालाच पाहिजे. नियमांचे काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी नियमावली कडक करण्यात येत आहे. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमाची परवानगी घेताना दहा हजार रुपये अनामत रक्‍कम भरावी लागणार आहे. कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन केल्याचे दाखविण्यासाठी कार्यक्रम ठिकाणचे व्हिडिओ आणि फोटो महापालिकडे सादर करावे. मगच ती अनामत रक्‍कम परत देण्यात येईल. अन्यथा दंड म्हणून ती रक्‍कम जमा करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Latest Marathi News Live Update : कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई: हावडा-दुर्गापूरमध्ये २४ ठिकाणी छापे

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

Girija Oak Favorite Dish: नॅशनल क्रश गिरीज ओकचं सीक्रेट रिव्हील! नागपूरची ही एक वडी… जिचं नाव ऐकून स्टारचंही मन हरवलं!

SCROLL FOR NEXT