School_students 
सोलापूर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुषखबर ! त्यांच्याच शाळेत देता येणार बोर्डाची परीक्षा; पण पालकांसाठी आहेत "या' सूचना

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोना वाढत असल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा देता येणार आहे. तसे नियोजन माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी केले आहे. त्यासाठी दहावी-बारावीचे शिक्षक वगळून पाचवी ते अकरावीच्या वर्गांवरील शिक्षकांना पर्यवेक्षकाची ड्यूटी दिली जाणार आहे. परंतु, को-मॉर्बिड तथा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना पर्यवेक्षकाची ड्यूटी दिली जाणार नाही. 

यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. दहावीसाठी 16 लाख तर बारावीसाठी अंदाजित 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात सोलापूर शहर- जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पारंपरिक परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा घेणे शक्‍य नसल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत (गावात अथवा घराजवळ) परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरातील व्यक्‍ती कोरोनाबाधित अथवा जो विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी अंदाजे 15 जूनपूर्वी स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे. 

दरम्यान, परीक्षेपूर्वी पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त झालेल्या शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे. पालकांना त्यासंदर्भात परीक्षेच्या आठ दिवस अगोदर सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा होणार असल्याने जागेची कोणतीही कमतरता भासणार नाही, विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच प्राधान्य राहील, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी स्पष्ट केले. 

जूनमध्ये होईल विशेष परीक्षा 
दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार असून, त्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे. 
- दिनकर पाटील, 
अध्यक्ष, माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी म्हणाले... 

  • पर्यवेक्षकाची ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांची होणार परीक्षेपूर्वी कोरोना टेस्ट 
  • वर्ग नियंत्रण, परीक्षेचे नियोजन, शिस्त-नियमांचे पालन, अशी कामे ज्येष्ठ शिक्षकांना दिली जातील 
  • माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील पाचवी ते अकरावीच्या सर्वच शिक्षकांवर असेल परीक्षेची जबाबदारी 
  • तालुका स्तरावर परीक्षेचे नियोजन करण्याची केंद्र प्रमुखांवर जबाबदारी; त्यांच्या जोडीला सहाय्यक केंद्रप्रमुख असेल 
  • सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक - उच्च माध्यमिकच्या एक हजार 87 शाळांमधील सव्वालाख विद्यार्थी देतील परीक्षा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT