logo 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचा ऑगस्टअखेर पूर्ण होणार कार्यकाळ 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 659 ग्रामपंचायतींचा कालावधी जुलै ते डिसेंबर दरम्यान पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश या टप्प्यामध्ये असल्याने जिल्ह्याचे ग्रामीण राजकारण या कालावधीत ढवळून निघते. कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका यंदा लांबणीवर पडल्या असून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येत आहे. ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींची मुदत संपत असून प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या 659 ग्रामपंचायतींमध्ये जुलै महिन्यात चार, ऑगस्टमध्ये 123, ऑक्‍टोबर मध्ये 6, नोव्हेंबरमध्ये 520 आणि डिसेंबर मध्ये सहा ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत आहे. सप्टेंबर मध्ये एकाही ग्रामपंचायतीचा कालावधी पूर्ण होत नाही. जुलैमध्ये मुदत संपलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चार ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण झाली त्या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी व्यक्तीची नियुक्ती असावी असा एक मतप्रवाह असू प्रशासकावरुन सुरू झालेला वाद सध्या न्यायालयापर्यंत गेला आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असून या सुनावणीनंतर प्रशासक कोण असणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT