sanjaymama shindhe 
सोलापूर

लॉकडाऊनमध्ये विक्रेत्यांची कोरोना चाचणी करा, सोलापूरसाठी सर्व्हेलन्स अधिकारी नेमा 

प्रमोद बोडके

सोलापूर : नागरिकांना आवश्‍यक असलेल्या जीवनावश्‍यक वस्तू, साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर दूध, किराणा, भाजीपाला, मटण, कापड यासह इतर विक्रेत्यांकडे गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यातून होणारा कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त विक्रेत्यांची कोरोना चाचणी करावी अशी मागणी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

वस्तू खरेदीच्या माध्यमातून ग्राहकांचा विविध विक्रेत्यांशी थेट संपर्क येतो. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सध्या सोलापूर शहरासह काही गावांमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या कालावधीत व्यापारी आणि विक्रेत्यांची कोरोना चाचणी करणे सहज शक्‍य आहे. जे व्यापारी आणि विक्रेते कोरोना मुक्त आहेत, त्यांना लॉकडाऊननंतर दुकान उघडण्यास परवानगी देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल असा विश्‍वासही आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव आता सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात होऊ लागला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी कायमस्वरुपी डिस्ट्रिक्‍ट सर्व्हेलन्स अधिकारी नसल्याने कोरोना संदर्भातील सर्व्हेक्षण करण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या डिस्ट्रिक्‍ट सर्व्हेलन्स अधिकारी पदाचा पदभार करमाळ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. गायकवाड हे सोलापुरातून ये-जा करतात. त्यामुळे डिस्ट्रिक्‍ट सर्व्हेलन्स अधिकारी आणि करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी या दोन्ही पदांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी तत्काळ डिस्ट्रिक्‍ट सर्व्हेलन्स अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही आमदार शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

SCROLL FOR NEXT