Corona
Corona Media Gallery
सोलापूर

रुग्णवाढीनंतरही ग्रामीणमध्ये घटले टेस्टिंग ! जिल्ह्यात 5116 चाचण्या

तात्या लांडगे

रुग्णवाढीनंतरही ग्रामीणमध्ये घटले टेस्टिंग ! जिल्ह्यात 5116 चाचण्या; 428 रुग्णांची वाढ तर 23 जणांचा मृत्यू

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्या वाढवून रुग्ण शोधण्याचे आव्हान असतानाही टेस्टिंग मागील काही दिवसांपासून कमी झाले आहे. तर शहरातील रुग्णसंख्या अजूनही पूर्णपणे कमी झालेली नाही, तरीही टेस्टिंग साडेबाराशेपर्यंतच केल्या जात आहेत. सोमवारी शहर व ग्रामीणमध्ये एकूण पाच हजार 116 संशयितांची कोरोना टेस्ट झाली असून त्यात 428 रुग्ण वाढले आहेत. चिंतेची बाब म्हणजे ग्रामीणमध्ये 20 तर शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. (Testing in rural areas also declined after the corona outbreak)

ग्रामीण भागातील कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर दररोज सरासरी 13 ते 15 हजार संशयितांची कोरोना चाचणी होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील चार-पाच दिवसांत एकदाही दहा हजार संशयितांची कोरोना टेस्ट झालेली नाही. एकूण टेस्टच्या दहा टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. तरीही, टेस्ट घटण्यामागील नेमके कारण काय, याबाबत जिल्हा प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतील "कोरोनामुक्‍त गाव' या मोहिमेचा शुभारंभ करण्यापूर्वीच टेस्टिंग कमी झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींची अडचण झाली आहे.

सोमवारी ग्रामीण भागातील तीन हजार 887 संशयितांमध्ये 406 जण पॉझिटिव्ह आले असून एक हजार 341 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरातील दोन हजार 229 संशयितांमध्ये 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सोमवारी माढ्यात 30, मोहोळमध्ये 38, उत्तर सोलापुरात नऊ, दक्षिण सोलापुरात 14 रुग्ण वाढले आहेत. चिंतेची बाब म्हणजे अक्‍कलकोट तालुक्‍यात नऊ, मंगळवेढ्यात 35, पंढरपूर तालुक्‍यात 54 रुग्ण वाढले असून तेथील प्रत्येकी चौघांचा मृत्यू झाला आहे. बार्शीत 47, सांगोल्यात 44 रुग्ण वाढले असून तेथील प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. माळशिरसमध्ये 92 रुग्ण वाढले असून दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. चिंतेची बाब म्हणजे मृतांमध्ये पौट (ता. मंगळवेढा) येथील 28 वर्षीय महिलेचा, बनजगोळ (ता. अक्‍कलकोट) येथील 34 वर्षीय पुरुष, बोहाळी (ता. पंढरपूर) येथील 37 वर्षीय पुरुषाचा आणि खिलारवाडी (ता. सांगोला) येथील 30 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाची सद्य:स्थिती

  • एकूण रुग्ण : 1,51,565

  • मृत्यू : 3974

  • उपचार घेणारे रुग्ण : 6,123

"म्युकरमायकोसिस'चे वाढले 14 रुग्ण

कोरोना रुग्णांची चिंता प्रशासनासमोर असतानाच आता म्युकरमायकोसिसने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे केले आहे. सोमवारी शहर-जिल्ह्यात या आजाराचे 14 रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या 332 झाली असून आतापर्यंत 87 रुग्ण बरे झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT