002Child_Mask_0_2.jpg
002Child_Mask_0_2.jpg 
सोलापूर

रुग्ण वाढत असतानाही टेस्टिंग कमीच ! जिल्ह्यात पुन्हा तिघांचा मृत्यू; ग्रामीणमध्ये 44 तर शहरात 47 पॉझिटिव्ह

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आज 768 संशयितांमध्ये 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागातील 941 संशयितांमध्ये 44 पॉझिटिव्ह असून दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 12 हजार 706 तर ग्रामीणमधील रुग्णसंख्या आता 41 हजार 20 वर पोहचली आहे. शहर-जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 859 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही ग्रामीण व शहरातील संशयितांची टेस्टिंग वाढलेले नाही, हे आश्‍चर्य.

उत्तर सोलापूर सावरतेय
जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. आज पुन्हा या तालुक्‍यात एकही रुग्ण आढळला नसून सध्या 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर अक्‍कलकोट तालुक्‍यातील 20, बार्शीतील 73, करमाळ्यातील 93, माढ्यातील 99, माळशिरसमधील 123, मंगळवेढ्यातील 19, मोहोळमधील 15, पंढरपुरातील 73, सांगोल्यातील 32 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 15 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या 54 हजारांकडे वाटचाल करीत असून संशयितांचे टेस्टिंग वाढविण्यासंदर्भात जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाने केले. जिल्ह्यात दररोज सरासरी अडीच ते तीन हजार तर शहरात दररोज एक हजार संशयितांची टेस्ट केली जाईल, असे प्रशासनाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्यानुसार कार्यवाही दिसत नाही. विशेष म्हणजे आज (सोमवारी) शहर-जिल्ह्यातील एक हजार 709 संशयितांचीच टेस्ट करण्यात आली. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढू लागल्याने सध्या सुरु असलेल्या को-मॉर्बिड रुग्णांच्या सर्व्हेबद्दलही प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. मसलेचौधरी (ता. मोहोळ) येथील 77 वर्षीय पुरुषाचा तर बार्शीतील मनगिरे मळा येथील 52 वर्षीय महिलेचा आणि सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरातील 70 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून या संकटाला हद्दपार करण्याच्या निमित्ताने प्रत्येकांनी मास्कचा नियमित वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम काटेकोर पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍त, पोलिस अधीक्षकांनी केले आहे. 

शहरात 'या' ठिकाणी आढळले रुग्ण
एसआरपी कॅम्प (सोरेगाव), कोनापुरे चाळ, सन्मती नगर, इंदिरा नगर, निर्मिती विहार, निर्मल हाईटस्‌ (विजयपूर रोड), शिंदे चौक, मिहिर अपार्टमेंट, भवानी पेठ, क्षमा अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स्‌), साखर पेठ, गोल्डफिंच पेठ, गणेश सोसायटी, महेश कॉलनी (सम्राट चौक), लक्ष्मी मार्केटजवळ (दक्षिण कसबा), दत्त चौक, अवंती नगर, सिव्हील हॉस्पिटल क्‍वॉर्टरस्‌, शशिकला नगर (नई जिंदगी), गंगा नगर (भवानी पेठ), विनायक नगर, सिरत नगर, राजस्व नगर, निर्मिती विहार (भवानी पेठ), विनायक नगर, जुळे सोलापूर, शिवाजी नगर (बाळे), आदित्य नगर, आंबेडकर सोसायटी (सिव्हिल लाईन्स्‌), शास्त्री नगर, आसरा सोसायटी, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड) आणि दमाणी नगर येथे नवे रुग्ण आढळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT