Textile traders murder in Tembhurni shop 
सोलापूर

टेंभुर्णीतील कापड व्यापाऱ्याचा दुकानातच खून 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी येथील शुक्रवार पेठेतील चांदणी चौकातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ कापड व्यापारी बाळकृष्ण बलभीम घळके (वय 70) यांचा त्यांच्याच दुकानात रविवारी रात्री नऊ ते सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने डोक्‍यात मारून खून केला. यानंतर मारेकरी दुकानाचे कुलूप लावून निघून गेले. या घटनेमुळे टेंभुर्णी शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
टेंभुर्णी येथील शुक्रवार पेठेतील चांदणी चौकामध्ये बाळकृष्ण घळके यांचे कापड दुकान असून रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घरी जेवण करून दुकानात झोपण्यासाठी गेले होते. सकाळी बराच वेळ झाला तरी दुकानातून घरी न आल्याने मुलगा औदुंबर घळके हा दुकानाकडे आला. तेव्हा दुकानास बाहेरून कुलूप लावल्याचे दिसले. त्यामुळे घरातील दुसरी चावी आणून दुकानाचे कुलूप उघडले असता वडील बाळकृष्ण घळके हे दुकानातील आतल्या बाजूला मृतावस्थेत आढळून आले. ही घटना समजताच शुक्रवार पेठेतील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. बाळकृष्ण घळके यांच्या डोक्‍यास जबर जखम झाली असून डाव्या हातास भाजल्याचे दिसले. तसेच त्यांच्या अंगावर बनियन शिवाय इतर कपडे नव्हते. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे हे घटनास्थळी आले. बालकृष्ण घळके यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. दरम्यान, करमाळा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटनास्थळास भेट देऊन गुन्ह्याच्या तपासकामी सुचना दिल्या. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत बाळकृष्ण घळके यांचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. बालकृष्ण घळके यांचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचे गुढ उकलणे हे पोलिसासमोर आव्हान आहे. 
दरम्यान, मयत बाळकृष्ण घळके यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, सून, नातू असा परिवार आहे. रात्री उशीरा टेंभुर्णी येथील बेंबळे रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT