संचारबंदीच्या विरोधात पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन !  Canva
सोलापूर

संचारबंदीच्या विरोधात पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन !

संचारबंदीच्या विरोधात पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन !

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

संचारबंदी निर्णयाच्या विरोधात पंढरपूर व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर पंढरपूर (Pandharpur) शहरासह जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये जिल्हा प्रशासनाने येत्या 13 ऑगस्टपासून संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन (Agitation) सुरू केले आहे. आज (बुधवारी) दुसऱ्या दिवशी व्यापारी महासंघाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहर व तालुक्‍यात सतत लॉकडाउनमुळे नागरिक व व्यापारी वैतागले आहेत. मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात सतत लॉकडाउन असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच आता प्रशासनाने 13 ऑगस्टपासून अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी जाहीर केल्यामुळे व्यापाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचाच निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तीन दिवस आंदोलन पुकारले आहे. काल (मंगळवारी) घंटानाद आंदोलनाने निषेधाला सुरवात झाली. आज (बुधवारी) दुसऱ्या दिवशी सर्व व्यापाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. उद्या (गुरुवारी) पंढरपूर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. या वेळी रा. पा. कटेकर, किरण घाडगे, संतोष कवडे, सोमनाथ डोंबे, सचिन कारंडे, दत्ता लटके, कौस्तुभ गुंडेवार, अप्पा मुचलुंबे, श्री. कपडेकर आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT