Nilkanth River esakal
सोलापूर

सोलापूर: भोगावती व नीलकंठा नदीतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

शांतीलाल काशीद

हिंगणी धरण ओव्हरफ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला आहे.

मळेगाव (सोलापूर): बार्शी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील हिंगणी, ढाळे पिंपळगाव, जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून नद्यांना महापूर आले आहे. हिंगणी धरण ओव्हरफ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला आहे. पिंपरी (सा) येथील भोगावती नदीवरील पुलावरून नागरिक आणि शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे.

Bhogawati river

एकीकडे निलकंठा नदीला आलेला महापूर व दुसरीकडे भोगावती नदीला आलेला महापूर या दुहेरी संकटात पिंपरी ग्रामस्थ सापडले आहेत. शिक्षण, दवाखाना, किराणा साहित्य, गॅस आदी बाबीसाठी ग्रामस्थांना हिंगणी-मळेगाव-जामगाव-उपळे-हळदुगे,लाडोळे-वैराग असा 30 कि.मी अंतराचा प्रवास करवा लागत आहे. शनिवारी मध्यरात्री भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे रविवारी (ता.26) रोजी सेट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची मोठी तारांबळ उडाली. तर काहींना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचता आले नाही. सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून सोन्यासारखे आलेलं सोयाबीन, उडीद पीक मातीमोल झालं आहे. निलकंठा व भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे भुईसपाट झालेलं पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना, महिलांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे साकत येथील नीलकंठा नदीवरील व पिंपरी (सा) येथील भोगावती नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या मागणीने जोर धरला आहे. भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे पेशंट, शालेय विद्यार्थी, महिला, शेतकरी यांना पुल अरुंद असल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. नीलकंठा नदी व दुसरीकडे भोगावती नदी यामुळे पिंपरी गावास नेहमी बेटासारखे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे भोगावती नदीवरील पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.

- अविनाश काशीद-पिंपरी (सा)ग्रामस्थ

('सर आली धावून पूल गेला वाहून') अशी अवस्था साकत येथील निलकंठा नदीवरील पुलाची झाली आहे. अरुंद पुलाच्या दोन्ही बाजू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे उरलं सुरल सोयाबीन उडीदाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना नदीपात्रातून जाता येत नाही. प्रशासनाने पुलांची उंची वाढवून संरक्षक कठडे बसवून कायमचा प्रश्न मार्गी लावावा.

- गुरुदेव मोरे-साकत ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT