निसर्गाचा चमत्कार! म्हशीला झाले चक्क पांढरे सफेद रंगाचे रेडकू Sakal
सोलापूर

निसर्गाचा चमत्कार! म्हशीला झाले चक्क पांढरे सफेद रंगाचे रेडकू

निसर्गाचा चमत्कार! म्हशीला झाले चक्क पांढरे सफेद रंगाचे रेडकू

गजेंद्र पोळ

ऐन दिवाळीत निसर्गाचा चमत्कार दिसून आला! शेटफळ (ता. करमाळा) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क पांढरे सफेद रंगाचे रेडकू झाले.

चिखलठाण (सोलापूर) : ऐन दिवाळीत (Diwali) निसर्गाचा चमत्कार दिसून आला! शेटफळ (ता. करमाळा) (Karmala) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क पांढरे सफेद रंगाचे रेडकू झाले. हा या परिसरात कुतूहल व चर्चेचा तर या क्षेत्रातील तज्ज्ञांना अभ्यासाचा विषय ठरला आहे. तसेच परिसरातील शेतकरी व नागरिकांमधून या निसर्गाच्या चमत्काराबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जाते आहे.

आरोग्यासाठी गुणवत्तापूर्ण व चविष्ट दुधासाठी अनेकजण म्हशीच्या प्राधान्य देतात. या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणीही असते. आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या जातींच्या म्हशी पाळल्या जात असल्या तरी, त्यांचा रंग साधारणपणे काळा किंवा भोरा या प्रकारचा असतो. मात्र करमाळा तालुक्‍यातील शेटफळ येथील शेतकरी मारुती रोंगे यांच्या म्हशीने चक्क पांढऱ्या सफेद रेडकूला जन्म दिल्याने या भागातील लोकांच्या कुतूहलाचा व चर्चेचा विषय ठरला आहे. रोंगे यांनी आपल्या घरातील लहान मुलांना दुधाची गरज असल्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वी चाळीस हजार रुपये देऊन ही पैलारू म्हैस खरेदी केली. ती म्हैस दोन दिवसांपूर्वी व्याली, परंतु तिला म्हशीसारख्या रंगाचे रेडकू न होता गावरान गायीसारखी चक्क पांढऱ्या सफेद रंगाची रेडी झाली आहे. हा एक चमत्कारच किंवा अफवा आहे, अशी चर्चा या परिसरात रंगली आहे.

या परिसरात म्हशींची संख्या भरपूर आहे. अनेक वर्षांपासून म्हशी सांभाळणारे शेतकरी आजपर्यंत अशा प्रकारचे पांढऱ्या शुभ्र रंगाचे रेडकू कधीही पाहिले नसल्याचे सांगतात. काहीजण कृत्रिम रेतन करताना झालेल्या चुकीच्या बीजामुळे असे झाले असावे, असा तर्क काढत होते, तर काहीजण हा एक चमत्कार असल्याचे सांगत होते. यासंबंधी पशुवैद्यकीय डॉक्‍टरांना विचारल्यावर, हा काही कृत्रिम रेतन प्रक्रियेतील चूक किंवा चमत्कार नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये असे होऊ शकते, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले.

शेटफळ येथील रोंगे यांच्या म्हशीचे रेडकू हे अल्बिनो बफेलो याचा प्रकार असावा. आपल्या देशात क्वचित अशी उदाहरणे होतात. अमेरिकेत व काही देशात हा प्रकार आढळतो. म्हशीच्या हार्मोन्समधील बदलामुळे अशी घटना होऊ शकते. तिला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

- अवधूत देवकर, पशुवैद्यकीय अधिकारी, जेऊर, ता. करमाळा

गजेंद्र पोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT