Container hit four wheeler esakal
सोलापूर

दोन कंटेनरच्या मध्यभागी कार चक्‍काचूर! खोपोलीजवळ सोलापुरातील चौघांचा मृत्यू

खोपोली घाट रस्त्यावर टायर फुटल्याने एक कंटेनर उभा होता. त्या मार्गावरील वाहतूक स्लो होती. त्याचवेळी ब्रेक फेल झालेला कंटेनर वेगाने येत होता. काळ पुढे दबा धरून उभा असल्याची कोणतीही कल्पना नसलेल्या कारला कंटेनरने मागून जोरात धडक दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : खोपोली घाट रस्त्यावरील क्रमांक एकवर टायर फुटल्याने एक कंटेनर उभा होता. त्या मार्गावरील वाहतूक स्लो झाली होती. त्याचवेळी ब्रेक फेल झालेला कंटेनर वेगाने येत होता. काळ पुढे दबा धरून उभा असल्याची कोणतीही कल्पना नसलेल्या कारला त्या कंटेनरने मागून जोरात धडक दिली. तीन नंबर लेनवरून त्यांची कार एक नंबरवर थांबलेल्या कंटेनरला धडकली. त्याचवेळी ब्रेक फेल झालेला कंटेनरने त्या कारला मागून जोरात धडक दिली आणि त्यात कारचा जागीच चक्‍काचूर झाला.

मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारला कंटेनरची जोरात धडक बसली. त्या अपघातात कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, सौरभ तुळसे, सिध्दार्थ राजगुरु (तिघेही रा. बुध्द नगर, फॉरेस्ट) व तुळजापुरातील कदम अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. घाट रस्त्यावर टायर फुटल्याने पूर्वीपासूनच एक कंटेनर रस्त्यावर उभा होता. तो एक नंबर लेनवर उभा होता आणि अपघात झालेली स्विफ्ट कार तीन नंबर लेनवरून जात होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. त्याने त्या स्विफ्ट कारला जोरात धडक दिली. त्यामुळे तीन नंबर लेनवरून ती कार एक नंबर लेनवर आली आणि त्याठिकाणी उभा असलेल्या कंटेनरला मागून धडकली. तेवढ्यात मागून येणाऱ्या कंटेनरने पुन्हा एकदा जोरात धडक दिली आणि त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भयानक होता की, कारच्या एअर बॅगदेखील बाहेर आल्या नाहीत. समोरील कंटेनर आणि मागून आलेल्या कंटेनर, यांच्या मध्यभागी कार अडकली आणि ती चक्‍काचूर झाली, अशी माहिती स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. वारे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

पोलिस निरीक्षक वारेंनी सांगितली हकीकत...
- खोपोली, भोर घाटातील रस्त्यावर एक कंटेनर टायर फुटल्याने उभा होता.
- रस्त्यावरील वाहतूक स्लो होती; त्याचवेळी मागून येत असलेल्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला
- कंटेनरने स्विफ्ट कारला मागून जोरात धडक दिली; कार पुढे उभा असलेल्या कंटेनरला धडकली
- ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने कारला मागून धडक दिल्याने कारचे बोनेट मागील डिकीपर्यंत आले होते
- एअर बॅगदेखील उघडल्या नाहीत; चौघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांना खोपोली नगरपरिषदेच्या दवाखान्यात नेले आहे
- कंटेनरला मागून तीन गाड्या धडकल्या; त्या स्विफ्ट कारसमोरील एका चारचाकीतील तिघांचा जीव वाचला, पण ते गंभीर जखमी झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर पावसाचा मोठा फटका! खालापूरजवळ पाणी साचल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद; वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू; CM फडणवीसांनी मृतांच्या वारसांना जाहीर केली 5 लाखांची मदत

Pune Mumbai Train Update : लोणावळ्याजवळ मंकी हिल, ठाकूरवाडी घाटात दरड कोसळली; पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत, कोयना एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावणार

Mexico vs England : चिडले, रडले, भांडले... तरीही हरले! मेक्सिकोची घरच्या मैदानावर हार, इंग्लंड रोमहर्षक विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

पावसाचा हाहाकार! मिसिंग लिंकवर दरड कोसळली, 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे', मुंबई-गोवा महामार्गासह अनेक घाट रस्ते बंद

SCROLL FOR NEXT