containment zone
containment zone Esakal
सोलापूर

"लष्कर' परिसर रविवारनंतर घेणार मोकळा श्वास ! 19 बाधित

तात्या लांडगे

करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला एक हजारापर्यंत लोकांची गर्दी जमली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लष्कर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.

सोलापूर : लष्कर परिसर प्रतिबंधित क्षेत्र (Containment zone) म्हणून जाहीर केल्यानंतर या परिसरातील सुमारे अडीच हजार संशयितांची कोरोना (Covid-19) चाचणी पार पडली. त्यामध्ये आतापर्यंत 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, त्या सर्वांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दोन दिवसांत आणखी सुमारे एक हजार ते बाराशे संशयितांची कोरोना चाचणी केली जाणार असून, रविवारनंतर (ता. 23) या परिसरातील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. (The containment zone in the Lashkar area will be removed after Sunday)

शहरातील मोची समाजाचे कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला एक हजारापर्यंत लोकांची गर्दी जमली होती. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच उपस्थिती बंधनकारक आहे. तरीही, ते निकष बाजूला सारून शेकडो लोक म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहिले. कोरोना संसर्गाची माहिती देऊन गर्दी हटविताना पोलिसांसोबत बाचाबाची झाली. जवळपास दोनशे जणांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. पण, अंत्ययात्रेतील उपस्थितांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लष्कर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आणि बॅरिकेड्‌स लावून तेथील लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली.

या काळात पोलिसांनी स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून बेडर पूल, सिद्धार्थ चौक, जगदंबा चौक, मोहन नगर, जांबमुनी महाराज चौक, शास्त्री नगर वाय चौक, नवनीत अपार्टमेंट परिसर, महात्मा फुले झोपडपट्टी हा भाग सील केला. मागील पाच दिवसांत या भागातील अडीच हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता दोन दिवसांत आणखी टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. सध्या कोरोनामुळे सर्वत्र निर्बंध असून विनाकारण घराबाहेर कोणालाही पडता येत नाही. दरम्यान, हा भाग प्रतिबंधित क्षेत्र असला तरीही नागरिकांना भाजीपाला, दूध, रेशन धान्य हे बॅरिकेडजवळून पुरविले जात असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

करण मेहेत्रे यांच्या अंत्ययात्रेत मोठी गर्दी झाल्याने लष्कर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. रविवारनंतर या परिसरातील निर्बंध शिथिल केले जातील.

- डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपायुक्त, सोलापूर

बुधवारी सापडले होते 11 पॉझिटिव्ह

करण म्हेत्रे यांचे निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाल्यानंतर पोलिसांनी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आणि त्या ठिकाणच्या सर्व व्यवहारांवर निर्बंध घातले. या परिसरातील सरासरी 400 व्यक्तींची दररोज कोरोना चाचणी केली जात असून बुधवारी (ता. 19) 817 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यामध्ये 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तत्पूर्वी, सोमवार आणि मंगळवारी प्रत्येकी दोन जण बाधित सापडले होते. गुरुवारी (ता. 20) मात्र 490 जणांची टेस्ट झाली आणि त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. शुक्रवारी 404 जणांची टेस्ट केली असून त्यामध्ये चारजण पॉझिटिव्ह आढळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT