'सिद्धेश्‍वर कारखान्या'च्या चिमणीचे गुरुवारी काय होणार? esakal
सोलापूर

'सिद्धेश्‍वर कारखान्या'च्या चिमणीचे गुरुवारी काय होणार?

'सिद्धेश्‍वर कारखान्या'च्या चिमणीचे गुरुवारी काय होणार?

सकाळ वृत्तसेवा

महापालिकेने दिलेली मुदत बुधवारी (ता. 24) पूर्ण होत आहे. गुरुवारी (ता. 25) चिमणीचे काय होणार, असा प्रश्‍न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

सोलापूर : महापालिका प्रशासनाने श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) को-जनरेशनची चिमणी पाडण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी सात दिवसांची मुदत दिली होती. यादरम्यान कारखान्याचे न्यायालयीन द्वार बंद करण्यासाठी महापालिकेकडून (Solapur Municipal Corporation) न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असल्याची माहिती आयुक्‍त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांनी दिली. महापालिकेने दिलेली मुदत बुधवारी (ता. 24) पूर्ण होत आहे. गुरुवारी (ता. 25) चिमणीचे काय होणार, असा प्रश्‍न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

शासनाने श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार चिमणी पाडकामासाठी महापालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. मुदतीनंतर चिमणी पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, प्रदूषण नियमक महामंडळ, संबंधित मक्‍तेदार यांना लेखी पत्र देण्याबरोबरच महापालिकेने उच्च न्यायालयात श्री सिद्धेश्‍वर कारखान्या विरोधात कॅव्हेटही दाखल केले आहे. चिमणी पाडकामाची मुख्य कारवाई महापालिका प्रशासनाकडून होणार आहे. त्याकरिता चिमणी पाडकामासाठी प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच मक्‍तेदाराची नियुक्‍ती केली आहे.

मागील अनुभव लक्षात घेत, चिमणी पाडकामादरम्यान आवश्‍यक असलेल्या यंत्रणेबाबत महापालिका, पोलिस प्रशासन यांची दोन दिवसांपूर्वी संयुक्‍त बैठक झाली आहे. चिमणी निष्कासित करण्याची मुख्य जबाबदारी ही महापालिकेची आहे. या चिमणीचा तांत्रिक अहवाल तयार करून प्रदूषण महामंडळाला देखील महापालिकेने पाचारण केले आहे. चिमणी पाडकाम करताना यातून विषारी वायू बाहेर पडणार आहे. हे प्रदूषण थांबविण्याची जबाबदारी प्रदूषण मंडळाची असणार आहे. त्याबरोबरच बंगळूरच्या मक्‍तेदारालादेखील बुधवारनंतर पाडकाम होणार असल्याने यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बुधवारी चिमणीची मुदत संपणार, गुरुवारी चिमणीचे काय होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कारखान्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने चिमणी पाडकामाला स्थगिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे धाव घेतली आहे. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून चिमणी पाडल्यास गळीत हंगामाला बाधा निर्माण होईल. त्यामुळे चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याची मागणी कारखान्याच्या प्रशासनाने केली आहे. चिमणी पाडकामाचा विषय महापालिकेकडे असून, तुम्ही महापालिका आयुक्तांची भेट घ्या, असा सल्ला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कारखान्याला दिला असल्याचे समजते.

बातमीदार : प्रमिला चोरगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT