solapur gold robbery sakal
सोलापूर

८२ वर्षीय मालकीणीचे धाडस अन्‌ शहर गुन्हे शाखेचा यशस्वी तपास! विश्वासू कामगारानेच चोरले १८ लाखाचे दागिने

फिर्यादी तारा चंडक व गिरीश चंडक यांच्या देखभालीसाठी असलेल्या विश्वासू कामगारानेच घरातील १७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरल्याची बाब उघड झाली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत श्रीनिवास पगडीमल याला जेरबंद केले.

तात्या लांडगे

सोलापूर : फिर्यादी तारा चंडक व गिरीश चंडक या दोघांच्या देखभालीसाठी असलेल्या विश्वासू कामगारानेच घरातील १७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरल्याची बाब उघड झाली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत श्रीनिवास पगडीमल (रा. जुना विडी घरकूल) याला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचे संपूर्ण दागिने हस्तगत केले असून फिर्यादी तारा गिरीश चंडक (वय ८२, रा. पश्चिम मंगळवार पेठ, टिळक चौक) यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, मंगळवार पेठेतील चंडक परिवार हा सधन असून त्यांची दोन मुले परदेशात तर एक मुलगी रायपूरला तर दुसरी बंगळूरला नोकरीला आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने वयस्क पती-पत्नी नेहमीच मुलांकडे ये-जा करायचे. त्यावेळी घराची देखभाल करण्यासाठी त्यांच्याकडे चार मोलकरणी होत्या.

तसेच श्रीनिवास पगडीमल हा चंडक पती-पत्नीच्या देखभालीचे काम करीत होता. मार्च २०२१ मध्ये कपाटात ठेवलेले दागिने तारा चंडक यांनी दोन वर्षांनीच म्हणजे मे २०२३ मध्ये पाहिले. त्यावेळी त्यांना कपाटात दागिने आढळले नाहीत. त्यांनी मोलकरणींकडे विचारपूस केली. त्यावेळी यापूर्वी घरातील तीन लाखांची चोरी करणाऱ्या मोलकरणीवर सर्वांचा संशय होता. मात्र, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला पण काहीच हाती लागले नाही.

पोलिसांनी पुन्हा घरातील सर्वांचीच चौकशी केली. तांत्रिक तपास व खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना पगडीमलवर संशय बळावला. दोन दिवसांपूर्वी जुना पुना नाका येथून पुण्याला पळून जाताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या बॅगेत चोरीचे दागिने सापडल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे उपस्थित होते.

...म्हणूनच पोलिसांना चोरट्याबद्दल खात्री होती

तारा चंडक यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी त्यांच्या घरी पाहणी केली. त्यावेळी तिजोरीचे लॉक तुटलेले नव्हते, दरवाजाला देखील छेडछाड झालेली नव्हती. तारा चंडक या रायपूरला गेल्यावरच कोणीतरी बनावट चावीचा वापर करून अलगदपणे दागिने चोरून नेल्याचा पोलिसांचा संशय होता. पण, श्रीनिवास पगडीमल हा त्यांचा अत्यंत विश्वासू असल्याने चंडक यांचा त्याच्यावर संशय नव्हताच. हे कृत्य कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीचे असल्याने पोलिसांनी त्यादृष्टिने तपास केला आणि पगडीमल हाच चेार असल्याचे समोर आले. ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, सैपन सय्य, प्रकाश गाकवाड, वसीम शेख व अजय गुंड यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT