Covid Care Canva
सोलापूर

रुग्णांसाठी डॉक्‍टर देव बनून धावले ! वैरागात कोव्हिड सेंटर सुरू

डॉक्‍टर असोसिएशनने वैराग येथे 50 बेडचे कोव्हिड सेंटर सुरू केले आहे

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : वैराग (ता. बार्शी) येथे वाढती कोरोनाबाधित रुग्णसंख्या पाहून व रुग्णांवर उपचारासाठी बेड व इतर सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती पाहून रुग्णांसाठी डॉक्‍टर देव बनून धावले. कोरोनाच्या महामारीत "रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद घेऊन रुग्णसेवा करणाऱ्या वैरागच्या डॉक्‍टरांनी कोरोना रुग्णांसाठी पन्नास बेडचे "संतनाथ कोव्हिड डेडिकेटेड हेल्थ सेंटर' (हॉस्पिटल) सुरू केले आहे.

वैराग व परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सोयीसाठी वैराग डॉक्‍टर असोसिएशन संचलित संतनाथ कोव्हिड डेडिकेटेड हेल्थ सेंटरची सुरवात येथील नकाते मंगल कार्यालय, मोहोळ रोड, वैराग येथे करण्यात आली आहे. जगावर जे कोरोनाचे संकट आले आहे, त्याच्या अनुषंगाने कोरोना बाधित रुग्णांची होणारी गैरसोय पाहता रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, इंजेक्‍शन न मिळणे या गैरसोयी पाहून वैरागमधील काही डॉक्‍टरांनी पुढे येऊन या कोव्हिड सेंटरची स्थापना केली आहे.

यात अत्यंत माफक दरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या ठिकाणी 20 ऑक्‍सिजन बेडची सुविधा करण्यात आली असून, एकूण 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. सुहास मोटे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. संताजी देशमुख, डॉ. आनंद गोवर्धन, डॉ. सचिन पाटील, डॉ. पवन गुंड, डॉ. श्रेयस शिंदे, डॉ. रविकिरण ढेंगळे, डॉ. रियाज तांबोळी आदींच्या पुढाकाराने हे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

या कोव्हिड सेंटरमध्ये पन्नास बेडसह दोन रक्त तपासणी प्रयोगशाळा, एक्‍स- रे टेक्‍निशियन, मेडिकल स्टोअर आदींचीही सोय करण्यात आली आहे. या सेंटरला प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सचिन शेरखाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांचे सहकार्य लाभले आहे.

कोरोना कोणाला होऊ नये, पण झालाच तर रुग्णांनी घाबरून न जाता तत्काळ संतनाथ कोव्हिड डेडिकेटेड हेल्थ सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT