जिल्हा दूध संघ निवडणूक esakal
सोलापूर

दूध संघातून मिळणार आगामी निवडणुकांचा राजकीय फॉर्म्यूला!

दूध संघातून मिळणार आगामी निवडणुकांचा राजकीय फॉर्म्यूला!

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

निवडणूक जरी दूध संघाची असली तरीही आगामी निवडणुकांचा राजकीय फॉर्म्यूलाच या निवडणुकीतून जिल्ह्याला मिळण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर : राजकारणातील (Political) इरसाल डावासाठी सोलापूरचे (Solapur) राजकारण प्रसिद्ध आहे. डाव बारामतीचा (Baramati) असो की अकलूजचा (Akluj), डाव निमगावचा असो पंढरपुरातील (Pandharpur) पंत वाड्यावरील, सोलापूरच्या राजकारणात अनेक चमत्कार घडले आहेत. अलिकडच्या काळात आमदार विजयकुमार देशमुखांच्या (Vijaykumar Deshmukh) "सिद्धलीला'मधूनही मोठं-मोठे राजकीय चमत्कार घडले आहेत. विधानपरिषद निवडणूक पुढे गेली, डीसीसीची Solapur DCC Bank) निवडणूकही पुढे गेली. जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची निवडणूक साधारणत: महिन्याभरात होण्याची शक्‍यता आहे. राजकीय पक्षांचे वेगवेगळे झेंडे खांद्यावर घेतले तरीही नवी-जुनी मैत्री अन्‌ खुन्नस कायम आहे. दूध संघाच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणातील स्थानिक गटबाजी / मैत्री जगजाहीर होण्याची शक्‍यता आहे. निवडणूक जरी दूध संघाची असली तरीही आगामी निवडणुकांचा राजकीय फॉर्म्युलाच या निवडणुकीतून जिल्ह्याला मिळण्याची शक्‍यता आहे. (The election of District Milk Union will present new political equations)

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे गेली आणि जिल्ह्याच्या राजकारणातील मैत्री व गटबाजीचे नव्याने घडलेले बदल झाकून राहिले. डीसीसी निवडणुकीच्या माध्यमातून तरी हे बदल समोर येतील अशी शक्‍यता होती. बॅंकेच्या आर्थिक स्थितीचे कारण देत सध्या तरी डीसीसीची निवडणूक पुढे गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नक्की चाललंय तरी काय?, एकाच पक्षात राहून सध्या कोणाचं कोणासोबत जुळलंय अन्‌ कोणाचं कोणासोबत फाटलंय हे उघड होण्याची संधी गेली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

दूध संघाची निवडणूक कशी होणार?, कोणासोबत कोण जाणार? याबद्दल जिल्ह्याच्या राजकारणात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) सांगोल्यातील (Sangola) शेकापला राष्ट्रवादीमुळे (NCP) थोडक्‍या मतांनी आमदारकी गमवावी लागली. त्यामुळे येथील शेकापचा स्थानिक राष्ट्रवादीवर आजही राग आहे. आगामी निवडणुकीत शेकापकडून त्या डावाची साभार परतफेड सांगोल्यातील स्थानिक राष्ट्रवादीला होण्याची शक्‍यता आहे. प्रशासक येण्यापूर्वी दूध संघात सत्तेवर असलेला आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde), सांगोल्यातील शेकापचा गट, मोहोळमधील मनोहर डोंगरे (Manohar Dongare) यांचा गट दूध संघाच्या आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा ताकदवान दिसत आहे. त्यात त्यांच्याच विचाराच्या आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut), आमदार समाधान आवताडे (Samadhan Awtade), माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांच्या नावाची भर पडली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतून जन्माला येणारा नवा फॉर्म्युला डीसीसी, विधानपरिषद, जिल्हा परिषद, नगरपरिषदा व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकांमध्ये वापरला जाण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेच्या अध्यक्षाला भाजपचा लळा

शिवसेनेच्या (Shiv Sena) स्थापनेपासून सोलापूर जिल्हा परिषदेवर (Solapur ZP) धनुष्यबाणाचा सदस्य कधीही अध्यक्ष झाला नव्हता. राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे अनिरुध्द कांबळे यांच्या माध्यमातून भाजपच्या मदतीने झेडपीवर सध्या धनुष्यबाणावरील सदस्य अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसले आहेत. राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सत्तेचे सुर जुळले असले तरीही जिल्हा परिषदेत मात्र करमाळ्याच्या (Karmala) शिवसेनेचे सूर भाजपसोबत (BJP) जुळले आहेत. शिवसेनेच्या झेडपी अध्यक्षांना भाजपचा लळा लागल्याचे दिसत आहे. त्याचेही पडसाद आगामी काळातील निवडणुकीत उमटण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT