शेतकऱ्याने मागितली थेट मुख्यमंत्र्यांकडेच आत्मदहनाची परवानगी!
शेतकऱ्याने मागितली थेट मुख्यमंत्र्यांकडेच आत्मदहनाची परवानगी! esakal
सोलापूर

शेतकऱ्याने मागितली थेट मुख्यमंत्र्यांकडेच आत्मदहनाची परवानगी!

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

रस्ता अतिक्रमण मुक्त करा किंवा आम्हाला आत्मदहन करण्याची परवानी द्या, अशी विनंती येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीत केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पटवर्धन कुरोली ते पेहे (ता. पंढरपूर) (Pandharpur) या ग्रामीण मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, या मागणीसाठी पटवर्धन कुरोली येथील शेतकरी (Farmers) शंकर सावंत (Shankar Sawant) व त्यांच्या कुटुंबीयांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे कैफियत मांडत आत्मदहनास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. शेतकरी शंकर सावंत यांच्या मागणीनंतर पंढरपूर तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर ते पेहे या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. रस्ता अतिक्रमण मुक्त करावा, या मागणीसाठी सावंत कुटुंबीयांनी स्थानिक शेतकरी व ग्रामपंचायतीच्या विरोधात लढा उभारला आहे. शंकर सावंत यांच्या

मागणीनुसार रस्त्याची मोजणी देखील केली. त्यामध्येही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही रस्त्यावरील अतिक्रमण कायम आहे. रस्ता अतिक्रमण मुक्त करावा, या मागणीसाठी शंकर सावंत यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच लेखी तक्रार केली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे शासकीय रस्ता गायब झाला आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, अद्याप दखल घेतली नाही. येथील रस्ता अतिक्रमण मुक्त करा किंवा आम्हाला आत्मदहन करण्याची परवानी द्या, अशी विनंती येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीत केली आहे. थेट मुख्यमंत्र्यांनाच या शेतकऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्याची विनंती केल्याने स्थानिक प्रशासनात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scratch Card Fraud: कार्ड स्क्रॅच केलं अन् गमावले 18 लाख रुपये, लिफाफ्याच्या जाळ्यात अडकली महिला; वाचा धक्कादायक प्रकरण

Allu Arjun: आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

IPL 2024 Playoff Scenarios : आता 4 पैकी फक्त 3 जागा शिल्लक! 'हे' दोन संघ जाणार कन्फर्म; शेवटची सीट कोणाच्या नशीबात?

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Mother's Day 2024 : आई आणि मुलांच्या शारिरीक अन् मानसिक विकासासाठी फायदेशीर योगासने, जाणून घ्या सरावाची योग्य पद्धत

SCROLL FOR NEXT