Canva
सोलापूर

ड्रॅगनफ्रूट लागवडीला 40 टक्के अनुदान ! जाणून घ्या या फळाचे महत्त्व

ड्रॅगनफ्रूट लागवडीला 40 टक्के अनुदान ! जाणून घ्या या गुणकारी फळाचे महत्त्व

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

ड्रॅगनफ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्व आणि अँटिऑक्‍सिडंटमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे.

सोलापूर : ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) कमलकन हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. औषधी गुण, पोषकद्रव्ये याचा विचार करून 2021-22 पासून कृषी विभाग (Agriculture Department) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून (Integrated Horticulture Development Mission) ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान देत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने (District Superintendent Agriculture Officer Ravindra Mane) यांनी दिली. ड्रॅगनफ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्व आणि अँटिऑक्‍सिडंटमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. he government provides forty percent subsidy for dragon fruit cultivation-ssd73)

या फळात विविध औषधी गुण, फॉस्फरस, कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रति हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून 40 टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.

लागवडीची पद्धत

ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मीटर बाय 3 मीटर, 3 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट कॉंक्रीटचा किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर कॉंक्रिटची फ्रेम बसविण्यात यावी. सिमेंट कॉंक्रिट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in उत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT