वडेट्टीवारांचा मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात Canva
सोलापूर

मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात

वडेट्टीवारांचा मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात

तात्या लांडगे

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही या समाजातील बहुतेकजण शासकीय योजनांपासून दूरच आहेत. त्यामुळे आता ग्रामसेवक व सरपंच हे त्यांची जात ठरवतील, असा निर्णय आम्ही घेतल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

सोलापूर : गावगाड्यातील भटक्‍या विमुक्‍त जाती, जमाती, ओबीसी (OBC) समाजातील अनेकांकडे जात प्रमाणपत्र नाहीत. जातीचे पुरावे नसल्याने त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळत नाही. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतरही या समाजातील बहुतेकजण शासकीय योजनांपासून (Government schemes) दूरच आहेत. त्यामुळे आता ग्रामसेवक व सरपंच हे त्यांची जात ठरवतील, असा निर्णय आम्ही घेतल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले.

भटक्‍या विमुक्‍तांच्या मुक्‍ती दिनानिमित्त मंत्री वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोलापुरात निर्धार मेळावा पार पडला. या वेळी त्यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका मांडली. याप्रसंगी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे, सिद्धाराम म्हेत्रे, राजेश राठोड, माजी आमदार रामहरी रूपनवर, लक्ष्मण माने, नरसय्या आडम, सुशीला मोराळे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी महापौर नलिनी चंदेले, अलका राठोड, साधना राठोड, नवनाथ पडळकर, शेखर बंगाळे, भोजराज पवार, भारत नाईक, बाबा मिस्त्री, अनुराधा काटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक शरद कोळी यांनी केले होते.

मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, की हक्‍काचे असतानाही मागून मिळत नसेल तर वेळप्रसंगी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. ज्यांना आरक्षण हवे आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत, पण आम्हाला मागू नका. सत्तेला चिकटलेली व्यक्‍ती हिंमत करीत नाही, परंतु मी समाजासाठी लढणारा नेता असल्याने मला कोणाची भीती नाही. केंद्रात व राज्याच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये ओबीसी, भटक्‍या विमुक्‍तांचा दोन लाखांहून अधिक पदांचा बॅकलॉग आहे. राजकीय आरक्षणाबरोबरच समाजाला शिक्षण, नोकऱ्यांमध्येही पूर्णपणे आरक्षण मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

भटक्‍यांच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षण

भटक्‍या विमुक्‍त जाती, जमाती, ओबीसींच्या मुलांना आगामी काळात नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मोफत शिक्षण दिले जाईल, अशी योजना आखली आहे. या समाजातील ज्यांना घरे नाहीत, त्यांच्यासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविली जाईल. दरम्यान, हक्‍कासाठी समाज जागरूक झाला पाहिजे, राज्यात आणि देशात ओबीसींची संख्या मोठी असतानाही आपल्याला मागावे लागते, हे दुर्दैवच आहे. आगामी काळात आपण संघटितपणाने लढा दिल्यास निश्‍चितपणे देण्याची ताकद निर्माण होईल, असा विश्‍वास वडेट्टीवार यांनी व्यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice Presidential Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती निवडणुकीवर आता आणखी एका पक्षाने टाकला बहिष्कार अन् कारणही सांगितलं!

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT