बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याने पाडला शिरापूर येथे वासराचा फडशा ! Canva
सोलापूर

बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याने पाडला शिरापूर येथे वासराचा फडशा!

बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याने पाडला शिरापूर येथे वासराचा फडशा !

चंद्रकांत देवकते

चिंचोळी एमआयडीसी परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोहोळ (सोलापूर) : चिंचोळी एमआयडीसी (Chincholi MICD, Solapur) परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मोहोळ तालुक्‍यातील (MOhol Taluka) शिरापूर (सो) येथे बिबट्यासदृश वन्य प्राण्याने इतर दोन जनावरांवर हल्ला करून शेतातील संकरित गाईच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी (ता. 3) पहाटेच्या दरम्यान घडली.

या घटनेबाबत शिरापूर सो येथील पीडित शेतकरी दिग्विजय लिंबाजी ताकमोगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताकमोगे यांची शिरापूर येथे शेती आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दिग्विजय ताकमोगे शेतामध्ये पिकाला पाणी देण्याकरिता गावातून शेतामध्ये गेले होते. तेव्हा दावणीला बांधलेली सर्व जनावरे होती. साधारणतः सकाळी साडेसहाच्या दरम्यान पिकाला पाणी देऊन झाल्यानंतर जिथे जनावरे बांधलेली आहेत तिथे आले असता जनावरे उभा राहिलेली दिसली. आसपास पाहिले असता काही रक्ताचे डाग दिसले. तेव्हा दावणीकडे नजर टाकली असता एक जर्सी गाईचे कालवड दिसले नाही. त्याच्या जवळूनच त्याला ओढत घेऊन गेल्याच्या खुणा दिसल्या. त्या दिशेने उसामध्ये आत गेले असता जनावराने वासराचे पोट फाडून खाल्ल्याचे दिसले.

यादरम्यान इतर जनावरांकडे येऊन पाहिले असताना तिथेच बांधलेल्या एका खिलार गाईच्या वासराला व म्हशीच्या रेडक्‍यावरही हल्ला झाल्याच्या खुणा त्यांच्या शरीरावर दिसून आल्या आहेत. गतवर्षी भोयरे हद्दीतील बिबट्याचा वावर व मागील आठ दिवसांपासून चिंचोली काटी परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुक्‍यामधील विशेषत: शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गाईच्या वासरावर झालेला हल्ला हा बिबट्याचाच का? की बिबट्यासदृश अन्य वन्य प्राण्याचा? याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.

घटनास्थळी मंगळवारी सकाळी नऊ वाजता वनरक्षक सचिन कांबळे यांनी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. या वेळी त्यांनी वन्य प्राण्याचे ठसे पाहिले असता हे ठसे बिबट्याचेच आहेत, अशी माहिती त्यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT