सोलापूर

लोकमंगल अन्नपूर्णाची दहा लाख डब्यांची अविरत सेवा

संतोष सिरसट

माणुसकी हरवत चाललेल्या स्थितीतही लोकमंगल अन्नपूर्णा ने माणुसकीचा निर्माण केलेला झरा चांगल्या समाजासाठी आशेचा किरण आहे.

उत्तर सोलापूर (सोलापूर) : आजच्या समाजात माणुसकी हरवत चालली आहे. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना दोन-चार वेळा जेवण देण्याबाबतही विचार केला जात आहे. अशा स्थितीतही दररोज जवळपास 550 निराधार, दिव्यांग व्यक्तींना जेवणाचे डबे (lunch boxes)पोहोच करण्याचे काम लोकमंगल अन्नपूर्णा योजनेतून केले जात आहे. माणुसकी हरवत चाललेल्या स्थितीतही लोकमंगल अन्नपूर्णा ने (Lokmangal Annapurna Yojana)माणुसकीचा निर्माण केलेला झरा चांगल्या समाजासाठी आशेचा किरण आहे. आत्तापर्यंत जवळपास दहा लाख डब्यांचे अविरत वितरण करण्यात आले आहे.

8 मार्च 2013 या दिवसापासून लोकमंगल अन्नपूर्णा (Lokmangal Annapurna Yojana)ही निराधार लोकांसाठी जेवणाचे डबे पुरवणारी योजना सुरू झाली. सुरुवातीच्या काळात संथ गतीने सुरू असलेल्या या योजनेला पुन्हा सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक दानशूरांनी या योजनेसाठी मदत करण्यास सुरुवात केली. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ हे न आणता रोख स्वरूपात रक्कम घेऊन त्याच्या दुप्पट रक्कम संबंधित वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीने अन्नपूर्णा योजनेसाठी देऊ केली. अशा प्रकारे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीच्या जोरावर लोकमंगल अन्नपूर्णा योजना जवळपास दहा लाख डबे देण्याची सेवा आता पूर्ण करत आहे. मागील दोन वर्षांच्या काळामध्ये देशामध्ये लॉकडाऊन पडले होते. मात्र या काळातही लोकमंगल अन्नपूर्णा ची सेवा अविरतपणे सुरू होती.

समाजात दानशूरांची संख्या कमी नाही. अनेक जण मोठ्या प्रमाणात मदतही देऊ शकतात. मात्र, त्या मदतीतून जेवणाचे डबे तयार करून गरजुंपर्यंत ते पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम लोकमंगल समूहाच्या या योजनेच्या स्वरूपातून केले जात आहे. ही खरोखरच समाजाला दिशा देणारी गोष्ट म्हणावी लागेल. खरे तर अशी वेळच कोणत्याही व्यक्तीवर येऊ नये, अशी भावना जरी लोकमंगल समुहाची असली तरी आलेल्या परिस्थितीवर मात करत लोकमंगल अन्नपूर्णा ही अविरत सेवा देत आहे.

निराधार, गरजू, निराश्रित, अपंग अशा व्यक्तींना दररोज दोन वेळचे जेवण देणारी लोकमंगल ची अन्नपूर्णा योजना म्हणजे अनेकांची जीवनदायिनी ठरली आहे.

माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh)यांच्या मार्गदर्शनाने लोकमंगल फाऊंडेशन मार्फत ही योजना राबविली जाते. दररोज 550 सकस व पौष्टिक डबे अगदी वेळेवर ऑटो रिक्षा मधून गरजूंच्या घरापर्यंत पोचविले जातात. येत्या एक-दोन दिवसात दहा लाख डबे अविरतपणे पुरवण्याची सेवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेली ही निराधारांसाठीची योजना कौतुकास पात्र ठरते. वाढदिवस, पुण्यस्मरण अशा विविध प्रसंगाच्या निमिताने दानशूर व्यक्ती या योजनेला धान्याच्या स्वरूपात हातभार लावतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकालाही काही डबे आवर्जून दररोज देण्यात येतात. भुकेलेल्या पोटाची भूक भागविण्यासाठी कार्यरत असलेली ही योजना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सोलापुरात असलेल्या भुकेल्यांची संख्या कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला आता चळवळीचे रूप प्राप्त झाले आहे. काडीपेटी पासून ते मोठ्या प्रमाणात धान्य देण्यापर्यंतची मदत दानशूर लोक करत आहे. अद्यापही जवळपास चारशे ते पाचशे गरजूंची नोंदणी आमच्याकडे आहे. भविष्यात त्यांनाही जेवणाचा डबा पोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकसहभागामुळे ही आता लोकांची चळवळ झाली आहे.

- सुभाष देशमुख, आमदार तथा संस्थापक लोकमंगल समूह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT