सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा मोहिते-पाटील!
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा मोहिते-पाटील! Canva
सोलापूर

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा मोहिते-पाटील!

वैभव गाढवे

भाजप आणि कॉंग्रेस या राज्यातील महत्त्वाच्या दोन पक्षांची महत्त्वाची पदे आज मोहिते-पाटील परिवाराकडे आहेत.

सोलापूर : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील (Shankarrao Mohite-Patil) यांच्यापासून सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या राजकारणात (Politics) मोहिते-पाटील युगाला प्रारंभ झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील (Former Deputy Chief Minister Vijaysingh Mohite-Patil) आणि माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते- पाटील (Pratapsinh Mohite-Patil) यांनी त्यावर कळस चढवला. आता आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील (MLA Ranjitsingh Mohite-Patil), भाजप (BJP) जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील (Dhairyashil Mohite-Patil)) आणि कॉंग्रेसचे (Congress) नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील (Dhawalsinh Mohite-Patil) यांच्या रूपाने मोहिते- पाटील परिवाराची जादू आजही कायम आहे. भाजप आणि कॉंग्रेस या राज्यातील महत्त्वाच्या दोन पक्षांची महत्त्वाची पदे आज मोहिते-पाटील परिवाराकडे आहेत.

मोहिते-पाटील परिवाराच्या तीन पिढ्या जिल्ह्याच्या राजकारण आणि सहकारामध्ये सक्रिय राहिल्या आहेत. तीन पिढ्यांचा प्रभाव असलेले सोलापूर जिल्ह्यातील हे एकमेव उदाहरण. तीन पिढ्या सातत्याने लोकांच्या मनावर राज्य करत असतील तर त्यामागे त्यांचे लोकांसाठी केलेले कामही महत्त्वाचे ठरते. असे असले तरी, या प्रवासात अनेक चढ-उतार आले. मोहिते-पाटील हे नाव विविध कारणांनी कायम चर्चेत राहिले. माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर विजयसिंह मोहिते- पाटील यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र तो फसला आणि या निवडणुकीत त्यांचा कै. भारत भालके यांनी पराभव केला. माहिते- पाटील यांचा हा पराभव सुद्धा राज्यात चर्चेत राहिला. त्यानंतर काही काळ मोहिते- पाटील यांची राजकारणात पीछेहाट झाली. मात्र, आता पुन्हा भाजप आमदार रणजितसिंह, भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह यांच्या रूपाने जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील फॅक्‍टर महत्त्वाचा झाला आहे.

माळशिरस तालुका मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला. एखादा अपवाद वगळता विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, अकलूज ग्रामपंचायत, माळशिरस नगरपंचायत, बहुतांश गावांमधील ग्रामपंचायती, सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या यांवर मोहिते- पाटील आणि त्यांना मानणाऱ्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. सहकाराच्या माध्यमातून मोहिते- पाटील यांनी गावागावांमध्ये कार्यकर्ते निर्माण केले. तसेच सहकारामधून लोकांना ताकद दिल्याने त्याचा फायदा राजकारणात मोहिते- पाटील यांना झाला. मात्र, अलीकडच्या काळात मोहिते- पाटील कुटुंबाकडे असलेल्या सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती अडचणीत असल्याचे चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आणि त्या संस्थांना चांगले दिवस आणण्यासाठी मोहिते- पाटील यांच्या तिसऱ्या पिढीला काम करावे लागणार आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते- पाटील विरुद्ध शिंदे बंधू असा सामना रंगला आहे. यामध्येही वेळोवेळी मोहिते- पाटील यांनी शिंदे यांना मात दिल्याचे दिसून आले. याचे मोठे उदाहरण म्हणजे, माढा लोकसभा मतदार संघातील आमदार संजय शिंदे यांच्या पराभवाकडे पाहता येऊ शकते. आज मोहिते- पाटील भाजपसोबत आहेत आणि जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद निर्माण झाली आहे. त्याचा फायदा भाजप आणि मोहिते- पाटील या दोघांनाही होणार आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक आणि इतर निवडणुकांत मोहिते- पाटील फॅक्‍टर महत्त्वाचा ठरणार, हे निश्‍चित.

प्रशासनावर वचक आणि दरारा

मंत्री म्हणून काम करत असताना तसेच जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक या संस्थांचे नेतृत्व करत असताना विजयसिंह मोहिते- पाटील, प्रतापसिंह मोहिते- पाटील यांनी प्रशासनावर वचक कसा असावा, हे दाखवून दिले आहे. हे दोन्ही नेते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अकलूजहून सोलापूरला येण्यासाठी निघाले आहेत, असे समजले तरी अख्खे जिल्हा परिषदेचे प्रशासन आणि अधिकारी चिडीचूप होऊन आपापल्या कामात व्यस्त होत, इतका दरारा त्यांचा प्रशासनावर होता. अलीकडे जिल्हा परिषदेची एकूण स्थिती पाहिली तर पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात कुणाचा कोणाला मेळ नसल्याचे चित्र आहे.

डॉ. धवलसिंह यांना सिद्ध करण्याची संधी

मोहिते-पाटील यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये निर्माण झालेले राजकीय वितुष्ठ आजही कायम आहे. सर्व मोहिते- पाटील एकीकडे तर प्रतापसिंह मोहिते- पाटील दुसरीकडे, असा हा संघर्ष. प्रतापसिंह यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनीही तो कायम ठेवला आहे. प्रतापसिंह मोहिते- पाटील यांची धाडसी नेतृत्व म्हणून ओळख होती. त्यांनी अनेक लोक उभे केले. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले होते. त्याचा लाभ डॉ. धवलसिंह यांना होतो आहे. डॉ. धवलसिंह यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता कॉंग्रेस असा राजकीय प्रवास केला आहे. मात्र, त्यांना राजकारणात म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. आता कॉंग्रेसने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी देऊन स्वतःला सिद्ध करण्याची आणखी संधी दिली आहे. या संधीचे धवलसिंह सोने कसे करतात, हे येणाऱ्या काळात दिसून येईलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT