bjp maharashtra  sakal
सोलापूर

Rajyapal Niyukta Amdar : भाजप 'या' मुस्लिम नेत्याला पाठवणार विधानपरिषदेवर? समाजाची आग्रही मागणी !

Maharashtra BJP : आ.समाधान आवताडे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून तालुक्याच्या राजकारणामध्ये विश्वासू कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे

हुकूम मुलाणी ​

Latest Maharashtra News : राज्यपाल नियुक्त विधानपरिषद जागेवर आवताडे शुगर्स चे माजी अध्यक्ष सरोज काझी याना भारतीय जनता पक्षाच्या वतीने काम करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाकडून केली जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या हिंदू वोट कार्ड मुळे मुस्लिम समाज पक्षापासून दुरावला असून पंढरपूर विधानसभा क्षेत्रामध्ये मुस्लिम समाजाची मतांची निर्णायक संख्या पाहता मुस्लिम समाजाला न्याय देणे आवश्यक असून आ.समाधान आवताडे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून तालुक्याच्या राजकारणामध्ये विश्वासू कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे. (Marathi News )

सोलापूर जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाचा चेहरा या पक्षामध्ये प्रमुख पदावर नाही स्व.युन्नुश शेख यांना सोलापूर मधून यापूर्वी विधान परिषदेवर काम करण्याची संधी शरद पवार यांनी दिली होती त्यानंतर कोणत्याही पक्षाने या समाजाला संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला नाही. लोकसभा निवडणुकीत दलित,मराठा, मुस्लिम समाज हा भाजपाच्या विरोधात गेल्यामुळे 45 हजार पिछाडीवर भाजपाचा उमेदवार राहिला.

त्यांना परत जवळ करण्याच्या दृष्टीने आ. समाधान आवताडे यांनी या मतदारसंघ पंढरपूर येथे मराठा समाजासाठी मराठा भवन मंजूर करून त्याचे भूमिपूजन करून दाखवले तर भविष्यात दलित आणि मुस्लिम समाज जवळ करण्याच्या दृष्टीने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर संधी मिळणे आवश्यक आहे. आ.समाधान आवताडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्यांची ताकद काझीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरोज काझीनी लेबर फेडरेशनच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क निर्माण केला याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो व मुस्लीम समाजाला भाजपने न्याय दिला असल्याची भावना जिल्ह्यात निर्माण होऊन सकारात्मक बदल विधानसभा मतदानासाठी होईल असा विश्वास मुस्लीम समाजात व्यक्त होत आहे यामुळे सरोज काझी यांना ही संधी मिळणार का याकडे मुस्लिम समाजाचे लक्ष लागून राहिले,दरम्यान शहरात राहणाऱ्या मुस्लीम समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे लवकरच एक मुस्लीम शिष्टमंडळ ही मागणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आ सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे जाणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT