Corona Canva
सोलापूर

42 दिवसांत 634 मुले कोरोनाबाधित ! माढा तालुक्‍यात बाधित मुलांची संख्या लक्षणीय

माढा तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलांची संख्या वाढत आहे

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : माढा तालुक्‍यात कोरोना (Covid-19) बाधित रुग्णांमध्ये 15 वर्षे वयापर्यंतच्या मुलांची संख्या लक्षणीय असून, स्प्रेडिंग टाळण्यासाठी कोरोना बाधित मुलांना (Corona infected children) डॉक्‍टरांकडून योग्य उपचार घेऊन कडक विलगीकरणात ठेवण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या 42 दिवसांत तालुक्‍यातील 6 हजार 510 कोरोनाबाधित झालेल्या लोकांपैकी 634 (9.73 टक्के) बाधित 15 वर्षे वयापर्यंतची मुले आहेत. यात सकारात्मक बाब म्हणजे 15 वर्षे वयापर्यंतच्या कोरोना बाधित मुलांची मृत्यूदर शून्य आहे. (The number of corona positive children is increasing in Madha taluka)

गेल्या काही दिवसात माढा तालुक्‍यातच नव्हे तर सर्वच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्यांबरोबर लहान मुलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसते आहे. डॉक्‍टरांच्या मतानुसार, या मुलांना अपवाद वगळता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची आवश्‍यकता भासत नाही. परंतु त्यांनी योग्य उपचार घ्यावेत. घरातील इतरांच्या संपर्कात न येता कडक विलगीकरणात राहणे आवश्‍यक आहे. या मुलांनी बाहेर खेळावयास जाऊ नये किंवा इतर मित्रांबरोबर मिसळू नये. या गोष्टी पाळल्यास कोरोनाचे स्प्रेडिंग टाळता येईल.

आकडे बोलतात...

एप्रिल 2021

  • तालुक्‍यातील एकूण टेस्ट : 28 हजार 421

  • कोरोनाबाधित अहवाल : 4 हजार 524

  • 15 वर्षे वयापर्यंतच्या बाधित मुले : 470 (मृत्यू 0)

1 मे ते 12 मेपर्यंत

  • तालुक्‍यातील एकूण टेस्ट : 8 हजार 307

  • कोरोनाबाधित अहवाल : 1 हजार 986

  • 15 वर्षे वयापर्यंतची बाधित मुले : 164. ( मृत्यू 0)

लहान मुले पॉझिटिव्ह असतील तर त्यांना घरातील इतर व्यक्तींमध्ये किंवा मित्रांमध्ये मिसळू न देता डॉक्‍टरांकडून उपचार घेऊन कडक विलगीकरणात ठेवणे आवश्‍यक आहे. विशेषतः मधुमेह किंवा इतर आजार असणाऱ्या कोरोनाबाधित मुलांची जास्त काळजी घ्यावी.

- डॉ. लकी दोशी, कुर्डुवाडी

संसर्ग वाढल्याने माढा तालुक्‍यातील अनेक गावे कोरोना हॉट स्पॉट झाली आहेत. अशा गावांत कडक निर्बंध पाळणे आवश्‍यक आहे.

- डॉ. शिवाजी थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी, माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT