कोरोना ग्राफ Canva
सोलापूर

कोरोना ग्राफ ! पहिल्या लाटेत 1844 तर दुसऱ्या लाटेत 2669 बळी

कोरोना ग्राफ! पहिल्या लाटेत 1844 तर दुसऱ्या लाटेत 2669 बळी

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा विचार केल्यास सर्वाधिक नुकसान हे दुसऱ्या लाटेत झाले आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील (Solapur) कोरोनाच्या (Covid-19) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा विचार केल्यास सर्वाधिक नुकसान हे दुसऱ्या लाटेत झाले आहे. पहिल्या लाटेत 1 हजार 844 तर, दुसऱ्या लाटेत 2 हजार 669 अशा एकूण चार हजार 513 जणांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे. पहिली लाट साधारणत: 26 एप्रिल 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या काळापर्यंत ग्राह्य धरली जाते तर, दुसरी लाट एक मार्च ते सध्यापर्यंत ग्राह्य धरली जाते. या दोन्ही लाटांचा तुलनात्मक विचार केल्यास पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी भीषण ठरली आहे. (The number of deaths of another wave is more than the first wave of Corona-ssd73)

पहिल्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या सात लाख 17 हजार 102 चाचण्या झाल्या. त्यामध्ये 52 हजार 279 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, या कालावधीतील पॉझिटिव्हिटी रेट 7.29 होता. या कालावधीत 1 हजार 844 जणांचा मृत्यू झाला असून या कालावधीतील मृत्यूदर 3.53 टक्के होता. या कालावधीतील कोरोनाचा रिकव्हरी रेट 96.27 टक्के होता. दुसऱ्या लाटेत तब्बल 13 लाख 19 हजार 868 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये एक लाख 20 हजार 557 एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या कालावधीतील पॉझिटिव्हिटी रेट 9.13 राहिला आहे. दुसऱ्या लाटेत 2 हजार 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून या कालावधीतील मृत्यूदर हा 2.21 टक्के राहिला आहे. या कालावधीतील कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.96 एवढा राहिला आहे.

पहिल्या लाटेमध्ये कोरोना ज्या पद्धतीने वाढला त्याच पद्धतीने खालीही आला होता. दुसऱ्या लाटेमध्ये मात्र कोरोना ज्या पटीने वाढला त्या पटीने खाली येताना दिसत नाही. सध्या ग्रामीण भागात सरासरी अडीचशे ते पाचशे नवे कोरोनाबाधित रुग्ण रोज आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा नवा प्रवास जिल्हा प्रशासनालाही अचंबित करू लागला आहे. सध्या कोरोनाचा ग्राफ (Corona Graph) हा खाली येण्याऐवजी आडवा चालत आहे. भविष्यात हा ग्राफ खाली येणार की पुन्हा वर जाणार? याचा अंदाज प्रशासनाकडून लावला जात आहे.

आकडे बोलतात...

  • उपलब्ध बेड : पाच हजार 138

  • लहान मुलांसाठी राखीव : 973 बेड

  • लहान मुलांसाठी ऑक्‍सिजनचे बेड : 533

  • लहान मुलांसाठी आयसीयूचे बेड : 224

  • लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरचे बेड : 66

  • फिजिशियन डॉक्‍टर : 190

  • बालरोग तज्ज्ञ: 112

पंढरपूर, माळशिरस अद्यापही डेंजर झोनमध्ये

गेल्या पंधरा दिवसांमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील पॉझिटिव्हिटी रेट 13.1, माळशिरस (Malshiras) तालुक्‍याचा 10.1 राहिला आहे. करमाळा (Karmala) तालुक्‍याचा 8.7, माढा (Madha) तालुक्‍याचा 6.1, मोहोळ (Mohol) तालुक्‍याचा 5.9 राहिला आहे. उर्वरित तालुक्‍याचा व सोलापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा पाचच्या आत आहे. माळशिरस, पंढरपूर (Pandharpur), करमाळा, माढा, मोहोळ या पाच तालुक्‍यांमध्ये अद्यापही नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT