Marigold Flowers  esakal
सोलापूर

फुलशेतीला अच्छे दिन! पापरीचा झेंडू दादरच्या बाजारात खातोय भाव

सध्यातरी उसापेक्षा फुलांचे पैसे जास्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे.

राजकुमार शहा

सध्यातरी उसापेक्षा फुलांचे पैसे जास्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे.

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ (Mohol) तालुक्‍यातील विविध प्रकारच्या फुलशेतीला अच्छे दिन आले असून सध्या झेंडू (Marigold) सर्वात जास्त भाव खात आहे. तर त्या पाठोपाठ शेवंती ही सूर धरून आहे. त्यामुळे सध्यातरी उसापेक्षा फुलांचे पैसे जास्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmers) समाधानी दिसत आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने फुलशेती (Floriculture) तोट्यात आली होती. झेंडू, शेवंतीची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र या पिकातील पाणी (Water) न संपल्याने ही पिके जाग्यावरच वंबळून गेली. त्यामुळे शेतकरी लाखो रुपये तोट्यात गेला. पहिले नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी आता फुलपिके लागवडीचे धाडस करेना. त्यामुळे रोपवाटिकाही अडचणीत आल्या. मात्र ज्या शेतकऱ्यानी धाडस करून झेंडू, शेवंतीची लागवड केली आहे. ज्यांचा माल सध्या विक्रीसाठी बाजारात जातोय, त्यांना अच्छे दिन आले आहेत. पापरी (ता. मोहोळ) परिसरात सध्या शंभर ते सव्वाशे एकरावर झेंडू व शेवंतीची लागवड आहे.

एखादा शेतकरी गरीब असेल तर त्याला रोपापासून ते फुले विक्रीस येईपर्यंत टेम्पो मालक आर्थिक सहकार्य करतात व नंतर आडतीवर माल विक्रीस आल्यावर शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पैशाची वजावट करून घेतात. सध्याचा मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांचा आहे. या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर सध्या लग्नसराईही सुरु आहे. त्यामुळे फुलांना मागणी वाढते आहे. दादर (मुंबई) बाजारपेठेत सध्या पापरीच्या फुलांचा बोलबाला आहे. ज्यावेळी हंगाम सुरू असतो, त्यावेळी गावातून दररोज तीन ते चार हजार कॅरेट विक्रीस जातात तर, मंदीच्या काळात एक ते दीड हजार कॅरेट विक्रीस जातात, अशी माहिती पापरी येथील टेम्पो मालक महावीर भोसले यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलो दर

- झेंडू - 150

- शेवंती - 100

- गुलाब - 120

- अस्टर - 120

- कापरी - 120

- निशिगंध - 100

गेल्या दोन महिन्यापूर्वच्या पावसामुळे फुलशेती तोट्यात गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. खर्चिक बाब म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा लागवड केली नाही. परिणामी बाजारात आवक कमी झाल्याने व फुलांना मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.

- मच्छिंद्र शेलार, फुल विक्रेते, दादर

माझे यापूर्वी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र नशिबावर हवाला ठेवून मी पुन्हा झेंडू लागवड केली आहे. माझे सध्या अडीच एकरात पाच लाख रुपये झाले आहेत. अद्यापही माल तोडणी सुरू आहे.

- हिरालाल टेकळे, शेतकरी, पापरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT