onion esakal
सोलापूर

कांद्याचा दर एक हजाराने उतरला! सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल सरासरी दर २५०० रुपयांचा; शुक्रवारी ४५२ गाड्यांची आवक

कांद्याला प्रतिक्विंटल पाच ते साडेपाच हजारांपर्यंत मिळणारा दर तब्बल एक हजार रुपयाने कमी झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. १३) ४५२ गाड्या कांदा आला होता. एकूण ४५ हजार २३७ क्विंटलमधील अवघ्या पाच क्विंटल कांद्याला पाच हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. उर्वरित कांदा सरासरी अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला.

तात्या लांडगे

सोलापूर : कांद्याला प्रतिक्विंटल पाच ते साडेपाच हजारांपर्यंत मिळणारा दर तब्बल एक हजार रुपयाने कमी झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. १३) ४५२ गाड्या कांदा आला होता. एकूण ४५ हजार २३७ क्विंटलमधील अवघ्या पाच क्विंटल कांद्याला पाच हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. उर्वरित कांदा सरासरी अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला.

सोलापूर बाजार समितीत मागच्या शनिवारी ५४६ गाड्या कांद्याची आवक होती. त्यावेळी सरासरी भाव साडेतीन हजार रुपये तर जास्तीचा भाव साडेसात हजारांवर होता. पण, १३ डिसेंबर रोजी (शुक्रवारी) ४५२ गाड्या कांद्याची आवक असताना सरासरी भाव अडीच हजारांवर होता. जास्तीत जास्त भाव पाच हजार ४०० रुपयांचा मिळाला, पण तोही केवळ पाच क्विंटल कांद्याला मिळाला. शुक्रवारी सोलापूर बाजार समितीत ११ कोटी ३१ लाख रुपयांची उलाढाल नुसत्या कांद्याच्या व्यवहारातून झाली. पण, शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाला नसल्याचे दिसून आले. कांद्याची आवक अपेक्षित वाढलेली नसताना देखील भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भाववाढीची शेतकऱ्यांना आशा आहे.

कांद्याची सोलापुरातील शुक्रवारची स्थिती

  • एकूण गाड्या

  • ४५२

  • कांदा क्विंटलमध्ये

  • ४५,२३७

  • कांद्याचा सरासरी भाव

  • २,५०० रुपये

  • कमाल भाव

  • ५,४००

भावात सुधारणा होण्याची आशा

पावसाळ्याच्या सुरवातीला लावलेला कांदा जागेवरच खराब झाल्याने यंदा कांद्याची अपेक्षित आवक झालेली नाही. मागच्या वर्षी दुष्काळाची स्थिती असताना देखील या दिवसा सोलापूर बाजार समितीत दररोज सरासरी ८०० ते एक हजार गाड्या कांद्याची आवक होती. यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दररोजची सरासरी आवक ४५० ते ५०० गाड्यांपर्यंत असताना देखील समाधानकारक भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, मागणी जास्त व आवक कमी असल्याने आगामी काही दिवसांत कांद्याचे दर पुन्हा पाच हजारांहून अधिक राहतील, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...

T20 World Cup नंतरही भारतात अडकलेले वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेचे अखेर मायदेशी परतणार; ICC कडून तिकीटांची सोय

Darpan Award for Padma Shri Dr. Smita Kolhe: मेळघाटातील सेवाकार्यासाठी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना परभणीत दर्पण पुरस्कार

इटलीतील सॅनरेमो म्युझिक फेस्टिव्हलमध्ये कबीर बेदी यांनी साजरे केले ‘सँडोकन’चे 50 वर्षे; "हा भावूक करणारा क्षण"

SCROLL FOR NEXT